गडचिरोली : शेतात कापूस वेचणी करीत असताना वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा (Gadchiroli) मृत्यू झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ या गाव शिवारात घडली. या घटनेमुळे (Tiger) परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घाबरत पसरली आहे. (Latest Marathi News)
सुषमा देवीदास मंडल असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. हि घटना आज सकाळी ११ विजेच्या सुमारास घडली आहे. सुषमा मंडल या महिलेसह काही मजूर गावनजिक असलेल्या शेतात कापूस वेचणीच्या कामासाठी गेले होते. या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला (Tiger Attack) करत महिलेच्या मानेला पकडून अंदाजे १०० मिटरपर्यंत फरफडत नेले. घटनास्थळी काही महिला सुषमासोबत कापूस वेचणी करीत होते. वाघाने हल्ला केल्याचे बघताच तिथून बाकीच्या महिलांनी पळ काढला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गावकऱ्यांची धाव
शेतातील महिलांनी गावाकडे धाव घेत गावात घटनेबद्दल माहिती दिली. काही वेळानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता वाघाने महिलेला तिथेच ठार केले असल्याचे दिसून आले. यामुळे आता संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.