Buldhana Crime: एटीएम मशीन घेऊन फरार झालेले चोरटे ताब्यात; तिघे मात्र फरार

Buldhana News ; घटना समोर आल्यानंतर एटीएम मशीन चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोधात पोलीस होते. येथील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी तपस सुरु केला होते.
Buldhana Crime
Buldhana CrimeSaam tv
Published On

संजय जाधव 

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन घेऊन चोरटे (Buldhana) फरार झाल्याची घटना घाडली होती. त्यांचा पोलिसांनी शोध घेतला असता जालना जिल्ह्याच्या हद्दीत चोरटे आढळून आले. त्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

Buldhana Crime
Vinayak Raut News : त्यांना पीएचडीचे महत्त्व कळणार; विनायक राऊत यांचा अजित पवारांवर निशाणा

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे एटीएम (ATM) मशीन घेऊनच चोरटे फरार झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली होती. आज सकाळी तीन वाजेच्या सुमारास एका पिकप व्हॅनमध्ये एटीएम मशीन टाकून पाच दरोडेखोरांनी पोबारा केला होता. घटना समोर आल्यानंतर एटीएम मशीन चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोधात पोलीस होते. येथील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी तपास सुरु केला होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana Crime
Ahmednagar Crime: शंकर बाबा सावली मठात चोरी; दानपेटी घेऊन चोरटा पसार

तिघे मात्र फरार 

दरम्यान आज सकाळी दरोडेखोरांना (Jalna) जालना जिल्ह्यातील मौजपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मशीन घेऊन हे दरोडेखोर जालना जिल्ह्यातील मोजपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांना दिसून आल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. यावेळी मौजपुरी पोलिसांनी दोन दरोडेखोरांना अटक केली असून तीन जण फरार झालेले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com