गणेश शिंगाडे
गडचिरोली : तेलंगणा राज्याच्या सीमेलगतच्या सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा कोटापल्ली परिसरतील सुमारे २० गावांतील नागरिक अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावाजवळ असलेल्या नदीवर शतकानुशतके पूल न बांधण्यात आलेला नाही. यामुळे आजही या परिसरातील नागरिकांना नावेच्या सहाय्याने नदी पार करावी लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात नावेतून प्रवास करणे जीवघेणा ठरत असतो.
राज्यातील दुर्गम आदिवासी भागात आजही मूलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत. रस्ते, पाण्याची समस्या प्रकर्षाने जाणवत असून आरोग्य सेवेचा देखील बोजबारा उडालेला पाहण्यास मिळतो. तर रस्त्याअभावी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र नेहमी पाहण्यास मिळते. अशीच परिस्थिती गडचिरोली जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकाचे गाव असलेल्या रेगुंठा कोटापल्ली परिसरात पाहण्यास मिळत आहे.
ब्रिटिश काळापासूनची समस्या आजही कायम
ब्रिटिश काळापासून तर आजही परिसरातील नागरिकांना नदीतून जीव धोक्यात घालून नावेच्या साहाय्याने दररोज शेकडो नागरिक प्रवास करत आहेत. सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परीसरात एकूण २० गाव वसलेले आहेत. हे तालुक्याचा मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर व जिल्हा मुख्यालयापासून २५० अंतरावर आहेत. या गावांना डोंगराखालचे गावे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या भागाकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने सध्या या परिसरात ये जा करण्यासाठी अजूनपर्यंत पक्क्या रस्ता सुद्धा बनलेला नाही.
आरोग्याच्या सुविधाही मिळेनात
विशेष म्हणजे परिसरातील कोणत्याही प्रकारचे उपचार मिळत नाही. त्यामुळे गरोदर महिला आणि अगदी काही निकडीचे प्रसंग असले, तरी याच नदीच्या मार्गाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. आता पावसाळा सुरू असून परिसरातील शेतकरी शेतामध्ये पेरणीचे कामे जोरदार सुरू आहेत. त्यामुळे रेगुंठा कोटापल्ली परिसरातील २० गावसह अहेरी तालुक्यातील जवळपास ५० गावातील नागरिकांना शेतीसाठी लागणाऱ्या विविध साहित्य तेलंगण राज्यातून विकत घेऊन यावे लागते. यासाठी नदीतून जीव धोक्यात घालून मोठा त्रास सहन करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.