Gadchiroli News Saam tv
महाराष्ट्र

Dengue : गडचिरोलीत डेंग्यूचा कहर; महिलेसह दोन जणांचा मृत्यू, मुलचेरा तालुक्यात ६६ रुग्ण

Gadchiroli News : डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छता यामुळे मुलचेरा तालुक्यात परिस्थिती गंभीर बनली आहे. तालुक्यातील येल्ला गावात दोन मृत्यूंमुळे गावकरी घाबरले असून स्वतःहून रक्त तपासणी करण्यात येत आहे.

Rajesh Sonwane

गणेश शिंगाडे  

गडचिरोली : पावसाळा सुरु झाल्यानंतर साथरोगांचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असतो. यात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा व चामोर्शी तालुक्यात डेंग्यूची साथ पसरली आहे. दोन्ही तालुक्यात अनेकांचे डेंगूची लागण झाली असून मुलचेरा तालुक्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात येल्ला गावातील दोन व्यक्तींचा तर शांतीग्राम गावातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 

सध्या पावसाळ्याचे दिवस असून अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके साचलेले आहेत. याठिकाणी डासांची उत्पत्ती होत असून साथरोग पसरत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात तर डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. यात मुलचेरा व चामोर्शी या तालुक्यांमध्ये अधिक रुग्ण आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली असून रुग्णालयात तपासणीसाठी रुग्णांची गर्दी होत आहे. 

एकाच गावात ४१ रुग्ण 

मूलचेरा तालुक्यात डेंग्यूने थैमान घातले असून गेल्या चार दिवसांत २३६ जणांच्या तपासणी करण्यात आली आहे. यात तब्बल ६६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात १४ वर्षांखालील १२ मुलांचा समावेश आहे. तर तालुक्यातील येल्ला गावात सर्वाधिक ४१ रुग्ण आढळले असून गावातील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. स्वतःहून रक्त तपासणी करत आहोत; असे उपसरपंच दिवाकर उराडे यांनी सांगितले.

रोज १०० रुग्णांची तपासणी 

दरम्यान १० ऑगस्टपर्यंत २५ रुग्णांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. येल्ला, लगाम, काकरगट्टा, गिताली, मच्छीगट्टा, टिकेपल्ली, शांतिग्राम येथे रुग्ण आढळले. गेल्या १० दिवसांत १ हजार ६५ रुग्णांची तपासणी झाली. दररोज १०० हून अधिक रुग्ण ओपीडीत येत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांच्या नेतृत्वाखाली १२ चमू उपाययोजना करत आहेत. पण रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT