महाराष्ट्र

Gadchiroli News : गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांचं बक्षीस असणाऱ्या ४ नक्षलवाद्यांचा खात्मा

Gadchiroli News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या C-60 पथकाने केलेली ही कारवाई मोठे यश मानले जाते. चकमकीनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र देखील जप्त केली आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मंगेश भांडेकर | गडचिरोली

Gadchiroli News :

गडचिरोली जिल्ह्यातील रेपनपल्लीच्या जंगलात सोमवारी रात्री पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. अहेरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रेपनपल्लीच्या जंगलात काल रात्री ही चकमक झाली. सध्या घटनास्थळी पोलिसांचे सर्च ॲापरेशन सुरू असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या C-60 पथकाने केलेली ही कारवाई मोठे यश मानले जाते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी खात्मा केलेल्या चार नक्षलवाद्यांवर 36 लाखांचे बक्षीस होते. चकमकीनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र देखील जप्त केली आहेत. यामध्ये Ak-47, एक कारबाईन, २ कट्टे नक्षली साहित्य इत्यादी जप्त करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काह दिवसांपूर्वीच देशात आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हल्ल्याच्या हेतूने हे नक्षलवादी गडचिरोली येथे आले होते. तेलंगणा राज्य कमिटीच्या या नक्षलवाद्यांनी प्रंहिता नदिमार्गे गडचिरोलीत प्रवेश केल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर C-६० आणि CRPF च्या जलद कृती दलाच्या टीमने शोधमोहीम सुरु केली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ऑपरेशन) यातिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही शोधमोहिम राबवण्यात आली. पोलीस मदत केंद्र रेपनपल्लीच्या 5 किमी अंतरावर कोलामार्का जंगलामध्ये आज पहाटे शोध घेत असताना 4 नक्षल्यानी C60 दलांच्या एका पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. C60 पथकांने देखील याला जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर 4 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले

ठार केलेल्या नक्षलवाद्यांची नावे

मृतांमध्ये डीव्हीसीएम वर्गेश, ⁠डीव्हीसीएम मगटू, कुरसंग राजू, कुडिमेट्टा व्यंकटेश या नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT