Gadchiroli Scam Saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli Scam : गडचिरोलीत ६ कोटींचा धान घोटाळा; दोघांना अटक

Gadchiroli News : धान आणि बारदाण्याचा अपहार ६ कोटी २ लाख ९३ हजार ८४५ रुपये किमतीचा असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले

Rajesh Sonwane

मंगेश भांडेकर 
गडचिरोली
: आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने खरेदी करण्यात येणाऱ्या धान खरेदीत ६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी आता गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महामंडळाचे गडचिरोली येथील तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्यासह महामंडळाच्या तत्कालिन कनिष्ठ सहायकास अटक केली आहे. 

गडचिरोली (Gadchiroli) येथे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने झालेल्या खरेदीत धान आणि बारदाण्याचा अपहार ६ कोटी २ लाख ९३ हजार ८४५ रुपये किमतीचा असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले होते. याप्रकरणी व्यवस्थापक गजानन कोटलावार यांना ८ ऑगस्ट २०२३ रोजी निलंबित करण्यात आले होते. आता या प्रकरणात कोटवालकर यांच्यासह आणखी एका जणास अटक करण्यात आली आहे.

१० जूनपर्यंत पोलीस कोठडी 

पोलिसांनी (Police) दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गजानन रमेश कोटलावार व व्यंकटी अंकलू बुर्ले अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यात कोटवालकर हा प्रादेशिक व्यवस्थापक तर व्यंकटी बुर्ले हा मार्कंडा (कं) येथील खरेदी केंद्राचा केंद्रप्रमुख आणि कनिष्ठ सहायक होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझी बायको घर सोडून गेली, मी जिवंत राहणार नाही; पाण्याच्या टाकीवर चढून नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Instagram : Instagram वर पॉपुलर होण्यासाठी फॉलो करा या 7 सुपरहिट स्टेप

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये 'तारक मेहता का उलटा चश्मा'मधील 'या' सदस्याची एन्ट्री, कोण आहे ती?

Gk : मोठ्या प्राण्यांचे तोंड लांब का असते? कारण वाचून तुम्ही ही पडाल विचारात

Maharashtra Live News Update : मंत्री गिरीश महाजन शिक्षकांच्या आंदोलन स्थळी

SCROLL FOR NEXT