Sangli News : लाचेची मागणी करणाऱ्या लिपिकावर गुन्हा दाखल; सांगलीतल्या कडेगांव नगरपंचायतमधील प्रकार

Sangli News : जमिनीचे गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देणेसाठी कडेगाव नगरपंचायतीचे लिपिक सागर माळी यांनी तक्रारदारकडे २४ हजार रूपये लाच मागणी
Sangli News
Sangli NewsSaam tv

सांगली : जमिनीच्या गुंठेवारी नियमाधीनतेचे प्रमाणपत्र देण्यासाठी २४ हजारांच्या लाचेची मागणी शेतकऱ्याकडे करण्यात आली होती. पैशांची मागणी करणाऱ्या सांगलीच्या कडेगांव नगरपंचायतच्या लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर रामचंद्र माळी असे गुन्हा दाखल झालेल्या लीपिकाचे नाव आहे. 

Sangli News
Latur Bribe Case : शेतकऱ्याकडून घेतली लाच; पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार एसीबीच्या जाळ्यात

सांगलीच्या (Sangli) लाचलुचपत विभागाने सदरची कारवाई केली. तक्रारदार यांच्या भावाने खरेदी केलेल्या जमिनीचे गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देणेसाठी कडेगाव नगरपंचायतीचे लिपिक सागर माळी यांनी तक्रारदारकडे २४ हजार रूपये लाच (Bribe) मागणी केली. या बाबतचा तक्रारी अर्ज २१ मे २०२४ रोजी सांगलीच्या लाच लुचपत विभागाकडे प्राप्त झाला होता. तक्रारीनुसार लाच लूचपतच्या पथकाने पडताळणी केली.  

Sangli News
Nandurbar News : गुजरातला जाणारा ३ लाख १८ हजाराचा दारूसाठा जप्त; शेतात धाड टाकून पोलिसांची कारवाई

त्यानुसार सागर माळी यांनी तक्रारदार यांचा भाऊ यांनी खरेदी केलेल्या जमीनीची गुंठेवारी नियमितीकरण करून प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे २४ हजार रूपये लाचेची मागणी केली (ACB) असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने लिपिक सागर रामचंद्र माळी यांच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्यात सलग दुसरी घटना घडल्याने प्रशासकीय यंत्रनेत खळबळ माजली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com