Gadchiroli Hostel Sakebite Case Update News  AI Image
महाराष्ट्र

Snake Bite : गडचिरोलीत वसतिगृहात थरार! सर्पदंशाने ३ मुलींचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Gadchiroli Snake Bite Update News : गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेच्या वसतिगृहात पाच विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना. उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाची धक्कादायक घटना

  • एकूण पाच विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केले

  • तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू

  • घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला

गणेश शिंगाडे, गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशाची धक्कादायक घटना घडली आहे. विषारी सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात रात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास वसतिगृहातील खोलीत साप शिरला. त्यावेळी सुमारे ७९ विद्यार्थिनी जमिनीवर झोपलेल्या होत्या. याचदरम्यान काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची माहिती आहे. उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत विद्यार्थिनींमध्ये दीपिका इतवा लकडा (इयत्ता सहावी), सुष्मिता सरोजीत मंडल (इयत्ता आठवी) आणि अनु गाजुर कोरेटी (इयत्ता दुसरी) यांचा समावेश आहे.

ही आश्रमशाळा गडचिरोली आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत चालविली जाते. विद्यार्थिनींना सर्पदंश नेमका कधी आणि कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. तसेच सर्पदंश झाल्यानंतर विद्यार्थिनींना वेळेत आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळाले का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. विद्यार्थिनींच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आश्रमशाळेतील वसतिगृहाची सुरक्षितता, स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या निवासाची परिस्थिती आणि आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेबाबतही चौकशी होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

Heart failure symptoms: हार्ट फेल्युअर होण्याच्या काही तासांपूर्वी दिसतात हे 5 बदल, तिसरं लक्षण दिसताच डॉक्टरकडे धावा

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त, 10 तोळा सोन्यात 14,700 रुपयांची घसरण; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

भीषण अपघात! मिनीबस अन् ट्रकची जोरदार धडक; ५ जणांचा जागीच मृत्यू, ७ जण मृत्यूशी देतायत झुंज

LPG Price September : 1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांसाठी मोठे बदल! सिलेंडरच्या दरांपासून e-KYC पर्यंत जाणून घ्या अपडेट्स

SCROLL FOR NEXT