Nitin Kodavate
Nitin Kodavate  Saam TV
महाराष्ट्र

Gadchiroli Politics : काँग्रेसचा आगामी निवडणुकीतील संभाव्य उमेदवारच भाजपच्या गळाला; गडचिरोलीतील राजकारणाला कलाटणी

प्रविण वाकचौरे

सूरज मसूरकर | मुंबई

Gadchiroli News :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लागलेली गळती कमी होण्याचं नाव घेत नाही. गडचिरोलीतील काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला आहे.

गडचिरोलीतील काँग्रेस नेते डॉ. नितीन कोडवते यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. नितीन कोडवते यांच्याकडे सध्या काँग्रेस प्रदेश सचिव पदाची जबाबदारी होती.

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. मात्र त्याआधीच त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. नितीन कोडवते यांच्या पत्नी चंदा कोडवते या २०१९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Session Live : तुम्हाला पण वाण नाही, पण गुण लागला, CM एकनाथ शिंदेंची विधानसभेत तुफान फटकेबाजी

VIDEO: Chhatrapati Sambhajinagar मधील टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना मारहाण

Government Job: तरुणांनो तयारीला लागा! महाराष्ट्र वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी; ५० हजारांपर्यंत मिळणार पगार, जाणून घ्या...

Ashadhi Wari 2024: प्रेमविवाहास कुटुंबाचा विराेध, उच्चशिक्षित युवतीचे माऊलींना साकडे; दानपेटीत सापडलेल्या चिठ्ठीत काय लिहिलेय?

VIDEO: गडचिरोलीत रुग्णवाहिकेअभावी चार वर्षीय बाळाचा मृत्यू , Vijay Wadettiwar यांनी विधानसभेत मांडला मुद्दा

SCROLL FOR NEXT