गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीमध्ये भीषण दुर्घटना
इमारत कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू, ३ जण गंभीर जखमी
इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु
गणेश शिनगडे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Gadchiroli Accident : गडचिरोली येथून एक भीषण दुर्घटना घडली आहे. गडचिरोलीच्या आरमोरी येथे एक इमारत खचल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. इमारतीमध्ये अजूनही काहीजण अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाच्या वतीने अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे हिरो कंपनी टू व्हीलर गाड्यांच्या शोरूमची इमारत खचली आणि कोसळली. या दुर्घटनेमुळे तीन नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे, तर तीन नागरिक गंभीररित्या जखमी आहेत. यातील एकाला ब्रह्मपुरी आणि दोघांना आरमोरी येथील रुग्णालयात दाखल केले आहेत. जखमींच्या कमरेला मार लागल्याचे म्हटले जात आहे.
आरमोरी येथे इमारत कोसळल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली आहे. परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. इमारतीत अडकेल्या नागरिकांना बाहेर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सदर इमारत नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे कोसळली असल्याचा आरोप स्थानिक आमदाराने केला आहे.
इमारत दुर्घटनेला नगरपंचायत कारणीभूत असल्याचे आमदार रामदास मसराम यांनी म्हटले आहे. साधारण ४५ वर्ष जुन्या जर्जर इमारतीकडे सुद्धा नगरपंचायतने दुर्लक्ष केले आहे, असे वक्तव्य रामदास मसराम यांनी केले आहे. दुसऱ्या बाजूला, जी इमारत कोसळली, त्या इमारतीसाठी काही महिन्यांपूर्वी संबंधित मालकाला नोटीस देण्यात आली होती. आरमोरी शहरात अशा १२ ते १३ धोकादायक इमारत असल्याची माहिती नगरपंचायतने दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.