इंधन दरवाढीचा नागपूर महापालिकेतील सत्तापक्ष असलेल्या भाजपला फटका संजय डाफ
महाराष्ट्र

इंधन दरवाढीचा नागपूर महापालिकेतील सत्तापक्ष असलेल्या भाजपला फटका

महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या गाड्या करणार सीएनजीवर

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर - सध्या इंधन Fuel दरवाढीचा फटका सर्वांनाच बसत आहे. इंधन दरवाढ सर्वांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. नागपूर महापालिकेत Nagpur Municipal Corporation सत्तेत असलेल्या भाजपला BJP देखील याची झळ सोसावी लागत आहे. यावर तोडगा म्हणून त्यांनी नागपूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या सर्व कार आता सीएनजीवर CNG करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे देखील पहा -

पेट्रोल आणि डिझेल दरवाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. दरवाढीमुळे अनेकांना कार आणि दुचाकी बाहेर काढणे परवडत नाही. जशी सर्वसामान्यांना याची झळ बसते आहे. तशी सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेचे आर्थिक उत्पन्न घटले आहे. त्यात मोठा खर्च अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांवर होत आहे.

त्यामुळे या गाड्यांच्या इंधनाचा खर्च महापालिकेला परवडत नाही. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या गाड्या आता सीएनजी वर चालविण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. याची सुरुवात स्वतः महानगरपालिकेचे परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी करत स्वतःची कार त्यांनी सीएनजीवर केली आहे. या निर्णयामुळे प्रदूषण कमी होण्यास देखील मदत होईल. मात्र, या इंधन वाढीची झळ सर्वांनाच सोसावी लागत असून आतातरी केंद्र सरकारने दरवाढ कमी करून दिलासा देण्याची गरज आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT