TB cases Maharashtra saam tv
महाराष्ट्र

TB cases Maharashtra: पुणे, नाशिक ते कोल्हापूर, नागपूरसह ११ हजार गावात टीबीचा विळखा, काय काळजी घ्याल? वाचा लक्षणं

TB cases Maharashtra: महाराष्ट्रातील ११ हजारांहून अधिक गावे टीबीच्या उच्च जोखमीमध्ये असल्याचं समोर आलं आहे. १०० दिवसांच्या मोहिमेत ६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले असून नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

देशाला टीबीमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने १०० दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतून धक्कादायक वास्तव समोर आलंय. देशातील दीड लाख, तर एकट्या महाराष्ट्रातील ११ हजार ९१ गावांना टीबीचा धोका आहे. २४ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेच्या पहिल्या ३५ दिवसांतच राज्यात ६ हजार १११ नवे क्षयरोगी आढळले आहेत.

क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सध्या 'एआय' आधारित व्हीएमटीबी टूलचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाद्वारे राज्यातील ११ हजार ९१ गावे 'हाय रिस्क' म्हणून निवडली आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती हाय रिस्क गावं?

यवतमाळ ५३९, अमरावती ५०४, नाशिक ४८८, रायगड ४८८, नागपूर ४८२, पुणे ४७९, चंद्रपूर ४६७, सातारा ४४२, गडचिरोली ४३३, नांदेड ४०४, अहिल्यानगर ४०१, रत्नागिरी ३८८, जळगाव ३८३, बुलढाणा ३६४, वर्धा ३५३, बीड ३४४, छत्रपती संभाजीनगर ३३९, कोल्हापूर ३१०, सोलापूर २९१, अकोला २४९, जालना २४२, गोंदिया २३९, लातूर २३८, नंदुरबार २३८, पालघर २३१, भंडारा २२६, परभणी २१२, ठाणे २१२, वाशिम १९८, सिंधुदुर्ग १८९, धाराशिव १८५, सांगली १८४, हिंगोली १७८, धुळे १७१

टीबी हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या बॅक्टेरियामुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम होतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये तो केवळ फुफ्फुसांपुरता मर्यादित राहत नाही आणि पाठीचा कणा, मेंदू आणि किडनी यांसारख्या शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो. त्यामुळे टीबीचं निदान तो गंभीर रूप घेण्यापूर्वीच करावं.

काय आहेत टीबीचं लक्षणं?

  • दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा सततचा खोकला

  • छातीत दुखणं

  • खोकल्यातून रक्त किंवा थुंकी पडणं

  • सतत अशक्तपणा

  • कोणत्याही कारणाशिवाय वेगाने वजन कमी होणं

  • ताप आणि रात्री खूप घाम येणं

टीबीची चाचणी कशी केली जाते?

  • टीबीचे निदान करण्यासाठी, डॉक्टर विविध चाचण्या करतात. या चाचण्या कोणत्या आहेत ते पाहूयात

  • त्वचा किंवा रक्त चाचणी- त्वचा आणि रक्त चाचण्यांद्वारे शरीरात टीबीचे बॅक्टेरिया आहेत की नाही हे पाहिलं जातं.

  • थुंकी चाचणी- यामध्ये टीबीचे जिवाणू ओळखण्यासाठी रुग्णाच्या थुंकीची तपासणी केली जाते. टीबीचं निदान करण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची चाचणी मानली जाते.

  • छातीचा एक्स-रे किंवा सीटी स्कॅन- या दोन्ही चाचण्यांद्वारे फुफ्फुसांची स्थिती तपासली जाते. यावरून छातीत टीबी किती प्रमाणात पसरला आहे याची माहिती मिळते.

टीबीवर उपचार कसे केले जातात?

टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. रुग्णाने आपला उपचार योग्यरित्या पूर्ण करणं आणि ६ ते ९ महिने नियमित औषधे घेणं गरजेचं आहे. उपचारांमध्ये एकाच वेळी अनेक अँटीबायोटिक्स दिली जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat: मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

पुढच्या आठवड्यात बारावीचा निकाल, दहावीच्या रिझल्टवरही अपडेट, mahresult.nic.in वर पाहा

Homemade Hair Mask Tips: उन्हामुळे केस कोरडे पडलेत? 'हे' 3 होममेड हेअर मास्क लावा, सिल्की आणि शायनी होतील तुमचे केस

Famous Actor : मृत्यूपूर्वी बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारने 388 कोटींचा चित्रपट दिला, एकेकाळी अभियन सोडून गेले होते ओशोंकडे

SCROLL FOR NEXT