Mumbai Crime News  Saam TV
महाराष्ट्र

भयंकर! तरुणीला पटवण्यासाठी त्यानं चक्क जीवलग मित्राला संपवलं

Mumbai Crime News : प्रेमात अडसर ठरणाऱ्या मित्राचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मीरा भाईंदर : प्रेमात अडसर ठरणाऱ्या मित्राचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. भाईंदरच्या रेल्वे खाडी पुलावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपीने मित्राला बोलायचे आहे म्हणून भाईंदरच्या रेल्वे खाडी पुलावर बोलावले. त्यानंतर तिथे गप्पा मारत असताना अचानक आरोपीने त्याच्या मित्राला खाडीत ढकलले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Mumbai Latest Crime News)

दिपक कटु (वय २२) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, सूरज विश्वकर्मा असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिम येथील शिवाजी रोड परिसरात राहणाऱ्या मृत दिपक कटु तरुणाचे कोमल नावाच्या तरुणीवर प्रेम होते. आरोपी सूरज विश्वकर्मा हा कोमलचा नातेवाईत असून तो दिपक कटु याला ओळखतो

कोमल आणि दिपक यांच्यातल्या प्रेमसंबधाची माहिती सूरजला होती. मात्र दुसरीकडे सूरजही कोमलवर एकतर्फी प्रेम करायचा. काही कारणांवर मागील काही दिवसात कोमल आणि दिपक हे वेगळे झाले होते. मात्र दोघांमध्ये बोलणं सुरू होतं. ही गोष्ट आरोपी सूरजला समजल्यानंतर दिपकचा कायमचा काटा काढण्याचा कट त्याने रचला.

१२ मे रोजी सूरजने दिपकला कांदिवलीच्या सरोवर हॉटेल येथे बोलावले. त्या ठिकाणहून भाईदरला काही काम असल्याचे कारण सांगत दिपकला सोबत घेऊन भाईदर गाठले. भाईंदरच्या रेल्वे खाडी पुलावर हे दोघंही गप्पा मारत असताना अचानक सुरजने दिपकला भाईंदरच्या खाडीत फेकत तेथून पळ काढला.

दुसरीकडे दिपक हा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिली. बेपत्ता दिपकचा शोध घेताना पोलिसांनी सूरजला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. दरम्यान, सूरजकडे केलेल्या चौकशीत त्याने हत्येची कबूली दिली.या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी कलम ३६४, ३०२ भा.द.वि कलमातर्गेत गुन्हा नोंदवून आरोपी सुरज विश्वकर्मा याला अटक केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT