Friend filed a crime against boyfriend Saam Tv
महाराष्ट्र

हे प्रेम होतं का फक्त शरीरसंबंधासाठी साधलेली जवळीक

साम टीव्ही ब्युरो

अहमदनगर ः ती लग्न करून सासरी गेली होती. परंतु नंतर पतीचे आणि तिचे काही जमेना. मग तिने नवऱ्यानेच तिला टाकली. मुलीला घेऊन ती माहेरी आली. यापुढचे आयुष्य एकटीने काढणे तेही तारूण्यात, तसे सोपे नव्हते. मग एकजण तिच्या आयुष्यात आला. उरलेसुरले त्याने लुटून नेले.

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका परित्यक्त महिलेची कथा आहे. त्याचे झाले असे ःपतीने टाकून दिल्याने तिचा पोटगीसाठी न्यायालयीन संघर्ष सुरू होता. एका मुलीसमवेत माहेरी राहताना संबंधित महिलेची एका युवकाशी मैत्री झाली. मग पाच वर्षे मैत्री थोडीच राहणार होती. त्याचे रूपांतर प्रेमात झालेच. Friend filed a crime against boyfriend

एकमेकांना भेटणं सुरू झालं. एके दिवशी प्रेमाने हद्द पार केली. दोघांत शरीरसंबंध आले. पुढचे आयुष्य एकमेकांसोबतच राहायचं असं त्यांनी ठरवलं होतं. शेवटी त्याने करायचे तेच केले. बरेच दिवस मागे लागूनही त्याने लग्नास नकार दिला. मग तिने त्याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः शहराच्या एका प्रभागात मुलीसह राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेने पहिल्या पतीपासून घटस्फोट व पोटगीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, तिची ओळख एका युवकाशी झाली. पाच वर्षांत मैत्रीचे रूपांतर प्रेमाच्या आणाभाका, घटस्फोटानंतर लग्न करून पहिल्या मुलीच्या शिक्षणासह सांभाळ करण्याचा शब्द, असा प्रवास करीत शारीरिक संबंधांपर्यंत पोचले. मात्र, त्यांच्यात झालेल्या वादातून त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे पीडितेने त्याच्याविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात, बलात्कार करून गर्भपातास भाग पाडल्याची व दमदाटी केल्याची फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. आता चर्चा सुरू झाली आहे, हे प्रेम होतं की शरीरसंबंधासाठी साधलेली जवळीक...Friend filed a crime against boyfriend

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात

Success Story: शाळेसाठी दररोज ६ किमी पायपीट; शेतातही केले काम; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

Saturday Horoscope: पाच राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; होणार धन वर्षाव, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Bhadrapada Amavasya 2025: आजच्या शनी अमावस्येचं महत्त्व जाणून घ्या; 'या' चुका करणं टाळा

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT