देवळाली कॅम्पच्या लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न
देवळाली कॅम्पच्या लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न  अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

Nashik: लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न; तोतया निवृत्त मेजरसह एकाला अटक

अभिजीत सोनावणे

नाशिक - नाशिकच्या देवळाली कॅम्प (Deolali military camp) या लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया निवृत्त मेजरसह आणखी एकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. देवळाली (Deolali) कॅम्पच्या लष्करी हद्दीतील गेट नंबर 7 वरील आर्मी गार्डला एका गाडीवर आर्मी लिहलेला व्यक्ती दिसला असता गार्डने या व्यक्तीला ओळ्खपत्राची मागणी केली असता माजी सैनिक असल्याचं सांगत एक्स इंडियन आर्मी सिक्युरिटी सर्व्हिसेस असं नाव असलेलं ओळ्खपत्र दाखवलं. (Fraud Attempt to enter Deolali military camp)

हे देखील पहा -

ओळखपत्र बनावट असल्याचं लक्षात येताच आर्मी इंटेलिजन्स आणि सेना पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली. यादरम्यान तोतया निवृत्त मेजरचा भांडाफोड झाला. चौकशीनंतर आर्मी इंटेलिजन्सनं मोहम्मद असद मुजीबुल्ला खान पठाण आणि त्याला ओळखपत्र बनवून देणाऱ्या आफताब मन्नान शेख उर्फ मेजर खान याला अटक केली आहे.

या दोघांच्या मोबाईलमध्ये लष्करी गणवेश परिधान केलेले फोटो आणि बनावट ओळखपत्र सापडली आहेत.धक्कादायक बाब म्हणजे मागील 10 दिवसांतली ही दुसरी घटना असून 10 दिवसांपूर्वीही लष्करी गणवेशात फिरणाऱ्या तोतया लष्करी अधिकाऱ्याला लष्करी छावणीत अटक करण्यात आली होती. त्यामुळे आर्मी इंटेलिजन्स ही बाब गंभीरतेने घेतली असून लष्करी हद्दीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

SCROLL FOR NEXT