Mumbai Corona: रुग्णसंख्येत वाढ! रुग्णशय्या वाढवण्याचा पालिकेचा निर्णय

महापालिकेचे कोविड बाधितांच्या उपचारासाठी १० जम्बो कोविड केंद्र आहेत, त्यापैकी ५ केंद्र सध्या सुरू आहे. गरजेनुसार इतरही केंद्र सुरू केली जाणार आहेत. पण रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास प्रत्येक जम्बो कोविड केंद्रात ५०० रुग्णशय्या वाढवल्या जाणार आहेत.
corona cases
corona cases Saam TV

मुंबई - कोरोनाचा (Corona) वाढती रुग्णसंख्या पाहता पालिकेने अतिरिक्त सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेने कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान कोविड बाधितांच्या उपचारासाठी जम्बो कोविड केंद्र (Jumbo Covid Centre) उभारले होते. त्यापैकी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यामुळे काही केंद्र बंद ठेवली होती. सध्या ही केंद्र पुन्हा कार्यान्वित केली जाणार आहेत. तसेच त्यातील व्यवस्थेत आणखी वाढ केली जाणार असल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे.(BMC decision to increase the number of beds)

हे देखील पहा -

महापालिकेचे कोविड बाधितांच्या उपचारासाठी १० जम्बो कोविड केंद्र आहेत, त्यापैकी ५ केंद्र सध्या सुरू आहे. गरजेनुसार इतरही केंद्र सुरू केली जाणार आहेत. पण रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास प्रत्येक जम्बो कोविड केंद्रात ५०० रुग्णशय्या वाढवल्या जाणार आहेत. त्यामुळे २० हजार अतिरिक्त रुग्णशय्या उपलब्ध होणार आहेत .

सध्या पालिकेच्या नेस्को गोरेगाव फेज-१, बीकेसी, रिचर्डसन अँड क्रुडास मुलुंड, रिचर्डसन अँड क्रुडास भायखळा आणि सेव्हन हिल्स रुग्णालय अशी ५ जम्बो कोविड केंद्र सुरू आहेत. तर,उर्वरीत पाच केंद्र बंद ठेवण्यात आली आहे. पण सुरू असलेल्या या ५ जम्बो कोविड केंद्रातील प्रत्येकी ५०% पर्यंत रुग्णशय्या भरल्यास लगेच इतरही केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.

corona cases
Shivsena: पन्नाशी ओलांडलेल्या इच्छूकांना उमेदवारी नाही? शिवसेनेचा विचार

प्रभागांत विलगीकरण केंद्र

पालिकेच्या २४ प्रभागात प्रत्येकी एक किंवा दोन विलगीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय .त्यासाठी पालिकेकडून जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. महापालिकेने यासाठी पुर्वी खासगी तसेच सरकारी इमारती ताब्यात घेतल्या होत्या. यात प्रामुख्याने बाधीतांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच विलगीकरण केले जात होत. आताही अशाच प्रकारची यंत्रणा उभी केली जाणार आहे .

सध्याची जम्बो कोविड केंद्रातली रुग्णशय्या संख्या

दहिसर चेक नाका, कांदरपाडा - ७००

मालाड जम्बो कोविड केंद्र - २,२००

नेस्को गोरेगाव फेज १ - २,२२१

नेस्को गोरगाव फेज २ - १,५०० ( बंद)

बीकेसी कोविड केंद्र - २,३२८

कांजूरमार्ग कोविड केंद्र - २०००

शीव जम्बो कोविड केंद्र - १,५००

आरसी भायखळा केंद्र - १०००

आरसी मुलुंड जम्बो केंद्र - १,७०८

एनएससीआय वरळी - ५००

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com