मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. गेल्या २५ वर्षांपासून शिवसेने (Shivsena) आपला भगवा महापालिकेवर सतत फडकवत ठेवला आहे. पण यंदाच्या निवडणुकीची (Election) जबाबदारी शिवसेनेच्या नव्या नेतृत्वाकडून लढवली जाणार आहे. त्यामुळे यावेळी तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांना तिकीट मिळवण्यासाठी वेट अँड वॉचवरच राहावं लागणार आहे. पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeary) यांनी आपल्या खांद्यावरचा भार हलका केल्या असल्याचं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeary) यांनी या आधीच म्हटलं होतं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये युवसेनेची सरशी असणार आहे हे स्पष्टच आहे. (Shivsena is now in the hands of new generation)
हे देखील पहा -
आदित्य यांच्या युवा सेनेतील नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना नगरसेवक तयार करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पन्नाशी खालील उमेदवार देण्याचा शिवसेनेचा विचार सुरू असल्याच म्हटलं जातं आहे. संसदीय राजकरणाची पहिली पायरी असलेल्या महापालिकेत आदित्य ठाकरे यांची टिम तयार करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पन्नाशी पुढील इच्छूकांना बाजूला ठेवून युवा सेनेला प्रामुख्याने स्थान देण्याचा विचार पुढे आला आहे.
दुसरं म्हणजे कोविड काळात ५० वर्षावरील नागरिकांच्या बाहेर फिरण्यावर आलेले निर्बंध, लसीकरणासाठी प्राधान्य आणि इतर अनेक गोष्टींमुळे पन्नाशीवरील उमेदवारांना तिकिटासाठी वेट अँड वॉच या भूमिकेत राहावं लागणार आहे. पन्नाशी ओलांडलेल्या इच्छूकांना उमेदवारी न देण्याचा विचार शिवसेना करत आहे .
पूर्णतः नवेच वा पन्नाशी खालीलचं उमेदवार असतील असंही नाही आहे. काही उमेदवार याला अपवादही ठरणार आहेत. ज्या प्रभागात नवे वा पन्नाशी खालील उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी सक्षम सापडणार नाहीत अशा ठिकाणी पन्नास वर्षावरील किंवा जुन्याच उमेदवारांची वर्णी लागणार आहे किंवा शिवसनेनेसाठी महत्वाच्या असलेल्या आणि पन्नाशी ओलांडलेल्या उमेदवारांचा देखील यात विचार केला जाणार आहे. सध्याची शिवसेने नगरसेवकांची फळी ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आहे .
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.