Solapur Pune Highway Accident News, Solapur News saam tv
महाराष्ट्र

Solapur Pune Highway Accident News : सोलापूर पुणे महामार्गावर चार वाहनांचा अपघात, एक ठार; ग्रामस्थांनी राेखली वाहतुक

या घटनेनंतर नागरिकांची महामार्गावर एकच गर्दी झाली.

विश्वभूषण लिमये

Solapur News : सोलापूर पुणे महामार्गावर (Solapur Pune Highway Accident News) आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास एक विचित्र अपघात झाला. या मार्गावर रस्त्यातच एक डंपर थांबल्यामुळे त्यापाठाेपाठ येणा-या चार वाहनांचा अपघात झाला. या घटनेत एक जण जागीच ठार झाला आहे. या अपघाताची माहिती समजताच पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. (Maharashtra News)

पाेलिसांकडून आणि घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी - सोलापूर पुणे हायवे महामार्गावर बाळे येथे अनाधिकृतपणे एक डंपर थांबल्याने हा अपघात झाला. या डंपरमागील कार ,दुचाकीसह चार वाहन एकमेकांना धडकली. त्यामुळे वाहतुक जागेवर थांबली.

या अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्तांची चाैकशी केली. यावेळी काही ग्रामस्थांनी पुणे महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे सोलापूर पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी चेकिंग पॉईंटला बॅरिकेटिंग केल्याने हा अपघात झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. पाेलिसांनी त्यांची समजूत काढून रस्ता माेकळा करण्याची विनंती केली. त्यानंतर वाहतुक सुरळीत झाली.

दरम्यान पोलिसांनी क्रेनच्या साह्याने अपघात झालेली वाहने रस्त्यातून बाजूला काढली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना सिव्हिल रुग्णालयत दाखल करण्यात आले आहे. तसेच अपघातात एक जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती विजय कबाडे (पोलीस उपायुक्त,सोलापूर) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : फ्लॅट देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधींना लुटलं, मुंबईतील बड्या बिल्डरचा कारनामा उघड

Shocking: सुंदर मुलांना पाहून यायचा राग, पाण्यात बुडून करायची हत्या; महिलेने चौघांना संपवलं, पोटच्या मुलालाही सोडलं नाही

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

KL Rahul: 358 रन्स करूनही भारताच्या पदरी पराभवच; 'या' खेळाडूंवर केएल राहुलने फोडलं खापर, म्हणाला, मी स्वतःला दोष देतोय कारण...!

Kitchen Hacks : आलं महिनाभर ताजं ठेवायचं? मग या सोप्या ट्रिक्स नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT