Gadchiroli yandex
महाराष्ट्र

Gadchiroli: गडचिरोलीमध्ये नदीत चार मुले बुडाली; आईने तिघांचे वाचवले प्राण, एकाचा मृत्यू

Gadchiroli: शाळकरी मुलांना पोहण्याचा मोह न आवरल्याने ते पाण्यात उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले.

Dhanshri Shintre

गडचिरोली तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गडचिरोली तालुक्यात शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातील तलावात चार शाळकरी मुले बुडाली. यातील तिघे थोडक्यात वाचले. मात्र, एकाचा मृत्यू झाला. हे चौघे पाण्यात पोहोण्यासाठी तलावात उतरले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली.

ही घटना ३० नोव्हेंबरला दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. नदी घाटावर दहा ते पंधरा वयोगटातल्या या मुलांसोबत त्यांची आईही सोबत होती. पाण्याचा अंदाज न आल्याने पोहायला म्हणून पाण्यात उतरलेली चार मुले एकापाठोपाठ बुडाली.

बुडत असताना मुलांची आरडा ओरड सुरू झाल्याने ताजु शेख या आईने पाण्यात धावत जाऊन उडी घेतली. दिशाने, लड्डू या आपल्या दोन मुलांसह रियाज अशा तीनही मुलांना सुरक्षीत पाण्याबाहेर बाहेर काढले. पण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेलेल्या जयंत शेख या मुलाला वाचवण्यात यश आलं नाही. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वी एकाचा मृत्यू झाला इतर तीनही मुले सुखरूप वाचली.

मच्छीमारांनी जयंत याचा शोध घेऊन त्याला पाण्यातून बाहेर काढले, मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रियाज शब्बीर शेख (१४), जिशान फय्याज शेख (१५), लड्डू फय्याज शेख (१३) हे सर्व रा. तेली मोहल्ला, हनुमान वॉर्ड, गडचिरोली येथे राहायचे. हे सर्वजण मिळून शहराजवळील बोरमाळआ नदी घाटावर फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्याबरोबर जिशान आणि लड्डू यांची आई देखील होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने मौजमजा म्हणून उतरलेली मुले एकापाठोपाठ बुडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

SCROLL FOR NEXT