Shivsena vs BJP Ratnagiri Vidhan Sabha Election Saam Digital
महाराष्ट्र

Shivsena vs BJP : कोकणात उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार; भाजपचा बडा नेता लवकरच शिवबंधन बांधणार?

Shivsena vs BJP Ratnagiri Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय वारं उलटं फिरलं असून महायुतीचे अनेक माजी आमदार आणि पदाधिकारी महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय वारं उलटं फिरलं आहे. 2014 आणि 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करणारे अनेक माजी आमदार तसेच पदाधिकारी पुन्हा स्वगृही वापसी करीत आहेत. त्यामुळे महायुतीला धक्क्यांवर धक्के बसत असून महाविकास आघाडीची ताकद वाढत आहेत. एकीकडे शरद पवार गटात इनकमिंत सुरु असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्यास अनेकजण उत्सुक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोकणातील भाजपच्या बड्या नेत्याने मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी ही भेट घडवून आणली असून लवकरच हा बडा नेता शिवबंधन बांधण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोकणात उद्धव ठाकरे यांची ताकद वाढणार असून भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बाळ माने असं या नेत्याचं नाव असून ते रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत माने यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची अत्यंत कमी शक्यता आहे. कारण, हा मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असून उदय सामंत येथून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्याच पक्षाला जागा सोडण्यात येणार आहेत.

त्यामुळे आमदार उदय सामंत यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित झाल्याने माने यांना तिकीट मिळणे मुश्कील असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर माने नाराज झाले असून ते दसऱ्यानंतर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील, अशा चर्चा रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. बाळ माने हे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे साडू आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माने आणि आमदार भास्कर जाधव यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यांच्या या इच्छेला उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती आहे. जर माने यांना तिकीट मिळाल्यास रत्नागिरीत सामंत विरुद्ध माने असा राजकीय सामना रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll 2024 : चंद्रकांत पाटलांना कोथरुडकर पुन्हा आमदार करणार का? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

Vasai Exit Poll: वसई मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर होणार आमदार? पाहा Exit Poll

Aishwarya Rai : लेकीच्या वाढदिवसाला बापाची गैरहजेरी? ऐश्वर्याने शेअर केले आराध्याच्या वाढदिवसाचे Unseen फोटो

Khadakwasla Exit Poll : तिरंगी लढतीत कोण जिंकणार? खडकवासल्याचा एक्झिट पोल काय सांगतो?

Chembur Exit Poll: चेंबूर मतदारसंघातून कोण मारणार बाजी? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT