shaikh hussain, nagpur, police, court saam tv
महाराष्ट्र

Nagpur News : काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षांना अटक; दीड करोडच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाई

सर्वोच्य न्यायालयाने हुसेन शेख यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळल्यानंतर झाली कारवाई.

संजय डाफ

Nagpur News : काँग्रेसचे माजी नागपूर शहराध्यक्ष शेख हुसेन (former president of nagpur city congress shaikh hussain) यांच्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी केली. न्यायालयाने हुसेन यांनी तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. (Maharashtra News)

शेख हुसेन हे नागपूरातील प्रसिद्ध हजरत बाबा ताजुद्दीनचे अध्यक्ष असताना त्यांनी ट्रस्टचे उत्पन्न स्वतःच्या खात्यात जमा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शेख हुसेन आणि माजी सचिव इकबाल वेलची यांनी 1 कोटी 59 लाख रुपये ट्रस्टच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या खात्यात जमा केली या आराेपाखाली त्यांच्यावर मागील सप्टेंबर महिन्यात सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता.

शेख यांनी सर्वोच्य न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला हाेता. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. रविवारी आर्थिक गुन्हे शाखेने शेख हुसेन आणि इकबाल वेलची यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे अशी माहिती अर्वीत चांडक (पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satin Silk Saree: महिलांसाठी सॅटिन सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न नक्की ट्राय क

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT