Ashok Bhangre Passed Away Saam Tv
महाराष्ट्र

Ashok Bhangre Passed Away : अजित पवारांचे निकटवर्तीय अशोक भांगरे यांचे निधन

अशोक भांगरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन बनसोडे

Ashok Bhangre Passed Away : अजित पवार यांचे निकटवर्तीय, अकोले तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक भांगरे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी एसएमबीटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भांगरे यांच्या अकाली निधनाने अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे..

अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक यासह अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. आदिवासी बहुल अकोले तालुक्यात मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर आदिवासी समाजाचे मोठे नेते मानले जाणारे अशोक भांगरे हे मात्र राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले.

विरोधकांची मोट बांधत त्यांनी विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किंगमेकरची भूमिका पार पाडत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिले. त्यामुळे अशोक भांगरे हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते.

नुकत्याच झालेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत कारखान्याचे उपाध्यक्ष झाले होते. गुरुवारी त्यांना त्रास होऊ लागल्याने घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अशोक भांगरे यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज शेंडी या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT