Raju todsam
Raju todsam  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politician : माजी आमदाराला तीन वर्षांची शिक्षा; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

Raju Todsam News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार प्रा.राजू तोडसाम यांच्यासह सहा जणांना शासकीय मालमत्तेचे जाळून नुकसान करणे तथा मालमत्ता चोरून नेल्याप्रकरणी तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल पांढरकवडा येथील जिल्हा व सत्र न्यायधीश प्रदीप नाईकवाड यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

पांढरकवडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २९ नोव्हेंबर २०१३ रोजी कापूस खरेदीच्या दरम्यान शेतकर्‍यांच्या कापसाला योग्य दर मिळत नसल्याच्या कारणातून शेतकर्‍यांमध्ये असंतोष पसरला होता. शेतकर्‍यांच्या मागण्याना घेवून चर्चा सुरू असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंदोलनाला हिंसक वळण लागले.

जमावाने बाजार समितीच्या मालमत्तेचे जाळून नुकसान केल्याप्रकरणी माजी आमदार प्रा. राजू तोडसाम यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. या जाळपोळीत तीन लाख ६५ हजार रुपयांचे जाळून नुकसान आणि एक लाख १२ हजार रुपयाचे साहित्य चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायधीश प्रदीप नाईकवाड यांनी निकाल दिला. प्रा. राजू तोडसाम,नारायण भानारकर, किशोर घाटोळ, विकेश देशट्टीवार,सुधीर ठाकरे,नंदकिशोर पंडीत यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली.तर संशयाचा फायदा घेत गिरीश वैद्य, संजय वर्मा,सुभाष दरणे आणि सुनिल बोकीलवार यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

कोण आहेत प्रा. राजू तोडसम ?

यवतमाळमधील (Yavalmal) आर्णी विधानसभेचे भाजपचे माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांनी एका वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये भाजपने तोडसाम यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे राजु तोडसाम यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी कांग्रेससोबत प्रवेश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cow Bike Riding Video: सगळं काही शक्य! गायीने केली बाईक रायडिंग, VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

PM मोदींनी चार टप्प्यांत 270 चा जागांचा टप्पा ओलांडला, अमित शहा यांचा दावा

Eggs : उकडलेली अंडी किती दिवस टिकतात?

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

SRH vs PBKS: अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची बॅट तळपली! हैदराबादसमोर विजयासाठी २१५ धावांची गरज

SCROLL FOR NEXT