Jadhav Saam Tv News
महाराष्ट्र

Harshvardhan Jadhav: आधी वॉरंट, आता थेट अटक; माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा पाय खोलात

Nagpur Police Harshvardhan Jadhav: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वीय सहायक आणि एका पोलीस अधिकार्‍याला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी त्यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्यात वारंवार वॉरंट बजावूनही जाधव न्यायालयात हजर होत नव्हते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना अटक करण्याचे आदेश दिले. सोमवारी नागपूर न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. तसेच नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

रूग्णालयात दाखल

हर्षवर्धन जाधव यांना अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना खासगी रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यावेळी त्यांच्या छातीत दुखायला सुरूवात झाली. डॉक्टरांनी त्यांना पुढील २४ तासांसाठी वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं. उपचारानंतर त्यांना अधिकृतरित्या अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

नेमकं कोणत्या प्रकरणात अटक?

२०१४ साली नागपूर विमानतळावर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वीय सहायक आणि एका पोलीस अधिकार्‍याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप होता. आरोप झाल्यानंतर सोनोगाव पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळे आणल्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ अंतर्गत जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

Fact Check : 7 तारखेला पगार न मिळाल्यास बॉसला जेल? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? जाणून घ्या

Bihar Politics : बिहारमध्ये काँग्रेसचं पानिपत; कोणत्या चुका ठरल्या पराभवाचं कारण?

SCROLL FOR NEXT