uddhav Thackeray  saam tv
महाराष्ट्र

भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत कुणीही करायला नकाे, उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठवणाऱ्या एकनाथ शिंदे गटावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जोरदार टीका करत आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर (Maharashtra Government) शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्यासाठी ठाकरे गट नवनवीन रणनीती आखत आहे. उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना(uddhav Thackeray) शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. भगव्याला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला दाखवून द्या. भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत व्हायला नको. माझा शिवसैनिकांवर विश्वास आहे. एकनाथ शिंदे गटाने नोंदणीसाठी एजंट लावले आहेत. जेवढी सदस्य संख्या ते करत आहेत, त्याच्या दहापट सदस्य संख्या मला हवी आहे, अंस ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन करतानाचा (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधताना पुढे म्हणाले, शिवसेनेची ताकत वाढली आहे.माझा शिवसैनिकांवर विश्वास आहे. एकनाथ शिंदे गटाने नोंदणीसाठी एजंट लावले आहेत. जेवढी सदस्य संख्या ते करत आहेत, त्याच्या दहापट सदस्य संख्या मला हवी आहे. केवळ गर्दी आणि फोटो नको. कारण फोटो घेऊन निवडणूक आयोगाकडे गेलो, तर तुमचे सदस्य दाखवा असे ते म्हणतील. त्यांच्या एजन्सी काम करत आहेत, असं म्हणत ठाकरे यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला.

मी कोणालाही कमी लेखत नाही.आपल्याला जिंकायचे आहे.मर्दासारखे जिंकायचे आहे.प्रतिज्ञा पत्र एवढी झाली पाहिजे की, भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. सगळ्यांना वेळेवर जबाबदारी नक्की देईल. कोणालाही शिवसेनेचा भगवा हिसकावून देऊ नका. भगव्याला हात लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला दाखवून द्या, असा इशारा ठाकरे यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्षपणे दिला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT