मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस (Devendra Fadnsvis) सरकार सत्तेत येऊन एक महिना पूर्ण झाले. पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली आहे.
उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी होऊ शकतो, यात १२ ते १५ मंत्री शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. हा शपथविधी साध्या पद्धतीने राजभवनवर होणार आहे, असं बोलले जात आहे.
हे देखील पाहा
सध्या राज्य संकटात आहे त्यामुळे शपथविधी हा साध्यापध्दतीने होणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता घटक पक्षांनी मंत्रिपदाची मागणी केली आहे. दरम्यान शिवसेना नेते रामदास कदम यांनीही मंत्रिमंडळा विस्ताराच्या बातमीला दुजोरा दिला आहे, दोन दिवसात विस्तार होईल असं त्यांनी म्हटले आहे.
रासपचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. भाजपने मित्रपक्षांचा सन्मान ठेवावा. पुढील दोन तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, यात रासपला मंत्रिपद मिळावे अशी मागणी महादेव जानकर यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसापासून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस बैठक सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.