Jagdish Gupta News, Amaravati Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधातील अनेक नेते सत्ताधारी पक्षांमध्ये दाखल झाले आहेत. कोकण, पुणे, मराठवाड्यासह विदर्भातील अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. आता सत्ताधारी पक्षातील नेताच दुसऱ्या सत्ताधारी पक्षात जाणार असल्याचे समोर आले आहे. भाजपचे नेते आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे. अमरावतीमध्ये जगदीश गुप्ता यांचे मोठं वजन आहे, त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय.
भाजपचे माजी मंत्री जगदीश गुप्ता हे शिंदे गटाच्या वाटेवर?
अमरावतीचे भाजपचे नेते माजी मंत्री जगदीश गुप्ता हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. लवकरच गुप्ता यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा सुद्धा अमरावतीमध्ये सुरू आहे. जगदीश गुप्ता हे अमरावती विधानसभेचे दोन वेळा आमदार व एक वेळा विधान परिषदेचे आमदार होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. ४ महिन्यात अमरावती महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, या निवडणुकीत जगदीश गुप्ता यांची भूमिका निर्णायक असणार आहे. जगदीश गुप्ता शिंदे सेनेत गेले तर शिंदे गट अमरावती शहरात मजबूत होणार आहे. भाजपचे मात्र प्रचंड या ठिकाणी नुकसान होऊ शकते. जगदीश गुप्ता यांच्यासोबत हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचा एक मोठा गट असून याचा फटका अमरावती महानगरपालिकेत भाजपला बसण्याची शक्यता आहे.
जगदीश गुप्ता यांच्याबद्दल -
जगदीश गुप्ता हे अमरावतीचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते होते. त्यांनी अमरावती मतदारसंघातून १९९५, १९९९ आणि २००४ मध्ये निवडणूक जिंकली होती. त्यांनी माजी पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. २०२१ मध्ये अमरावतीतील दंगलप्रकरणी त्यांना अटक झाली होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केल्याने भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले. यापूर्वी २०११ मध्येही त्यांचे निलंबन झाले होते. आता जगदीश गुप्ता हे भाजपला सोडून शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत.
दोन्ही काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात दोन्ही काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. यामुळे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये पाच नगरसेवक आणि दोनशेवर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. राजुरा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आमदार भोंगळे यांनी नवीन सदस्यांचे भाजपच्या दुपट्ट्याने स्वागत केले. या प्रवेशामुळे जिवती शहरासह तालुक्यात भाजपची ताकद आता वाढली आहे. राजुरा मतदारसंघात राष्ट्रवादीची फार ताकद नाही, मात्र काँग्रेस पक्ष मजबूत स्थितीत आहे. मात्र झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले. त्याचा फायदा भाजपने उचलला. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.