Lawyer Pays ₹90,000 for 12 KM Rickshaw Ride in Mumbai : वांद्रे ते अंधेरी प्रवास केला आणि रिक्षा भाडे 90 हजार, हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. पंजाबहून रोजगारासाठी मुंबईत आलेल्या एका वकिलाला वांद्रे ते अंधेरी हा रिक्षा प्रवास तब्बल 90 हजार रुपयांना पडला. अमूल्य शर्मा या तरुणाने १० एप्रिलच्या पहाटे पाच वाजताच्या सुमारास वांद्रे ते अंधेरी असा रिक्षाने प्रवास केला. अमूल्य चष्मा विसरला होता, चष्मा लावल्याशिवाय त्याला अंधुक दिसते त्यामुळे त्याने मोबाईल चालकाच्या हाती देत ऑनलाइन ॲपद्वारे व्यवहार करण्यास सांगितले. तेव्हा चालकाने दीड हजार रुपयांऐवजी तब्बल 90 हजार आपल्या खात्यावर घेतले.
शर्मा यांनी चालकाला विचारणा केली असता, चालकाने डिजिटल मीटरवर चुकीचे भाडे दाखवले गेले असल्याचे सांगितले. अमूल्य शर्मा यांनी याबाबत अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ऑटोरिक्षा चालक, ३२ वर्षीय रमेश यादव याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.