अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी
Domestic abuse over childlessness : मुलबाळ होत नसल्यामुळे एका विवाहितेचा छळ केल्याची घटना जालन्यातून समोर आली आहे. जालन्यातील घनसावंगी येथील घटना असून या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील एका शासकीय रुग्णालयात क्ष-किरण तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या एका विवाहितेचं 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील रवींद्र माळे यांच्याशी लग्न झालं.
लग्नानंतर तुझ्या सोबतच्या सर्वांना मुलबाळ झाल, तुला काहीतरी रोग आहे असे म्हणून सासरच्या लोकांनी छळ केला. तर नवऱ्याने पुणे येथे एमपीएससीसाठी क्लास लावायचे म्हणून माहेरून तीन लाख रुपये घेऊन ये असं म्हणत छळ केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणात विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुण सासरच्या पाच जणांविरोधात घनसांवगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नवऱ्याकडून एमपीएससीच्या क्लाससाठी पैशाची मागणी
जालना जिल्ह्यातील एका शासकीय रुग्णालयात क्ष - किरण तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या विवाहितेचे 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील रवींद्र माळे यांच्याशी लग्न झालं. लग्नानंतर दोन महिने सासरच्यांनी चांगले वागविले मात्र नंतर घरातील सासू-सासरे, पती हे छोट्या छोट्या कारणावरून छळ करू लागले . दरम्यान पती रवींद्र माळे याला पुणे येथे एमपीएससीसाठी क्लासेस लावायचे होते म्हणून त्यांनी माहेरहून तीन लाख रुपये घेऊन ये असं सांगून देखील छळ केल्याचं समोर आला आहे.
नवऱ्यासह सासरच्या पाच जणांविरोधात घनसांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जालन्यात मुलबाळ होत नसल्यामुळे एका विवाहितेचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. लग्नानंतर तुझ्या सोबतच्या सर्वांना मुलबाळ झालं तुला का होत नाही , तुला काहीतरी रोग आहे. असं म्हणून विवाहितेचा छळ केल्याच समोर आला आहे. या प्रकरणात विवाहितेच्या फिर्यादीवरून रवींद्र माळे ,रमेश माळे यांच्यासह इतर तीन महिलांविरोधात जालन्यातील घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास घनसावंगी पोलीस करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.