Former BJP Corporator Attempts Killed HimSelf Saam Tv
महाराष्ट्र

Former BJP Corporator: धक्कादायक! भाजपच्या माजी नगरसेवकाचा पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्येचा प्रयत्न

Former BJP Corporator Attempts Killed HimSelf: भाजपच्या माजी नगरसेवकाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी भाजपच्या माजी नगरसेवकाने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांना देण्यात येणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे, साम प्रतिनिधी

नवी मुंबईतील कर्जतमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. कर्जतमधील पोलीस ठाण्यातच भाजपच्या माजी नगरसेवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पोलीस अधिकाऱ्यांसमोरच माजी नगरसेवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती हाती आलीय. भरत जाधव, असं आत्महत्या करणाऱ्या माजी नगरसेवकाचं नाव आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, भरत जाधव यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भरत जाधव हे सध्या व्हेंटिलेटर असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. भरत जाधव यांना व्यवसायामध्ये आणि राजकीय जीवनात काम करताना त्रास देण्यात येत होता. याची माहिती त्यांनी या व्हिडिओमधून दिली होती. त्याचमुळे त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं असावं, असं म्हटलं जात आहे.

भरत जाधव यांच्यावर सध्या नवी मुंबईतील अपोलो या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भरत जाधव हे सध्या व्हेंटिलेटर असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती समोर येतेय. भरत जाधव यांचं कर्जत जामखेड येथे गृहप्रकल्पाचे काम सुरु होते मात्र त्यामध्ये काही स्थानिक दलाल त्रास देत आहेत त्यासोबतच प्रभागात सामाजिक आणि राजकीय काम करत असताना स्थानिक राजकारणी ज्यामध्ये भाजपा पदाधिकारी आणि माजी नगरसेवक आणि त्यांच्या सहकाऱ्यांची देखील नावे भरत जाधव यांनी घेतली आहेत.

भरत जाधव यांच्या कुटुंबीयांतर्फे त्रास देणाऱ्या प्रत्येकावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केलीय. भरत जाधव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने नवी मुंबईत मात्र खळबळ उडालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

SCROLL FOR NEXT