jalgoan crime news Saam tv
महाराष्ट्र

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

jalgoan crime news : जळगावमध्ये दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे. भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये.

Vishal Gangurde

जळगावच्या शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन गटांत हाणामारी

भाजपच्या माजी नगरसेवकासह काही जणांना मारहाण

मारहाणीच्या घटनेमुळे शहरात उडाली मोठी खळबळ

संजय महाजन, साम टीव्ही

जळगावमून धक्कादायक बातमी हाती आली आहे. जळगावमध्ये चक्क शनीपेठ पोलीस ठाण्यामध्ये दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. तक्रार देण्यासाठी आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकासह दोन ते तीन जणांना मारहाण झाली. या मारहाणीनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

जळगावच्या वाल्मीक नगरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांचे कार्यकर्ते आणि तरुणांच्या एका गटासोबत वाद झाला होता. या वादानंतर भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे काही जणांसोबत तक्रार देण्यासाठी शनीपेठ पोलीस ठाण्यात आले होते.या दरम्यान दुसरा गट पोलीस ठाण्यात शिरला. त्यानंतर माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह त्यांच्यासोबतच्या तीन ते चार जणांना मारहाण केली.

कैलास सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील दुसऱ्या गटातील तरुणांना प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून घटनेवर नियंत्रण मिळवलं. भाजपच्या माजी नगरसेवकांना पोलीस वाहनातून दुसरीकडे हलविण्यात आलं आहे.

घटनेनंतर राखीव पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त शनिपेठ पोलीस ठाणे आणि ठाण्याबाहेर तैनात करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी देखील शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले. ते पाहणी करत माहिती घेत आहेत. दोन गटातील वादाला महानगरपालिकेच्या निवडणुकीची किनार असल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही गटाच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हाणामारीच्या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Fort : कोकण ट्रिपचा प्लान करताय? मग रत्नागिरीतील 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहायला अजिबात विसरू नका!

Thursday Horoscope : मनाप्रमाणे दिवस जाईल, ५ राशींच्या व्यक्तींवर गणेशाची कृपा राहणार; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Baba Vanga Prediction : भूकंप, मुसळधार पाऊस अन् विनाशकारी संकटं; बाबा वेंगाने आधीच दिला होता इशारा?

Ind vs AFG : दो भाई, दोनो तबाही... शुभमन, इशान किशनची तेजतर्रार शतके; भारतानं अफगाणिस्तानविरुद्ध उभारला धावांचा डोंगर

मोठी बातमी! आता मोठं काही तरी घडणार? ठाकरे गटाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी

SCROLL FOR NEXT