forest department fines 13 tourists collects 11 thousand rupees at amboli ghat waterfall
forest department fines 13 tourists collects 11 thousand rupees at amboli ghat waterfall Saam Digital
महाराष्ट्र

Amboli Waterfall: आंबाेली घाट धबधबा परिसरात 13 पर्यटकांवर वनविभागाची कारवाई, 11 हजार 500 रुपयांचा दंड वसूल; जाणून घ्या नियम

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

आंबोली घाट व धबधबा परीसरात अस्वच्छता करणाऱ्या पर्यटकांना सावंतवाडी वनविभागाने दणका दिला आहे. गेल्या 2 दिवसांत 13 पर्यटकांवर वनविभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनूसार संबंधित पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्याकडू एकूण 11 हजार 500 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पावसाळ्यात आंबाेली घाट व धबधबा पाहण्यासाठी राज्यातील तसेच राज्य बाहेरी पर्यटक येत असतात. अनेकदा पर्यटकांकडून घाट परिसरात तसेच धबधबा परिसरात कचरा टाकला जाताे. यामुळे पर्यावरणाला बाधा पाेहचते.

त्यावर उपाय म्हणून सावंतवाडी वनविभागाने आंबोली परिसरात कचरा टाकणे, अस्वच्छता करणे, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपान करणा-यांवर दंडात्मक कारवाईचा ठराव केला आहे. यामध्ये एक हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

या निर्णयाची अमलबजावणीस प्रारंभ देखील केला. गेल्या 2 दिवसांत वनविभागाने कचरा टाकणाऱ्या 2, धूम्रपान करणाऱ्या 3, मद्यपान करणाऱ्या 2 तर माकडांना खाऊ घालणाऱ्या 6 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PHOTOS: केस चिकट आणि डोक्याला खाज येतेय का?, या सोप्या टिप्स करा फॉलो

Marathi Live News Updates: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची थोड्याच वेळात बैठक

Sweets Disadvantages: जास्त बर्फी खाणं पडेल महागात, आरोग्यसाठी आहे घातक

Shruti Marathe : नजर ना लागो या सौंदर्याला; श्रुती मराठेच्या व्हिंटेज लूकनं वेधलं नेटकऱ्याचं लक्ष

Anayadikuthu Waterfalls : डोळ्यांचं पारणं फेडणारा अनायादिकुथु धबधबा

SCROLL FOR NEXT