Raigad News राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

'आती क्या रूम पे' म्हणत तरुणीची छेडछाड; डॉमिनोज पिझ्झाच्या व्यवस्थापकाला अटक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - अमीर खान याचा गुलाम सिनेमातील 'आती क्या खंडाळा' हे गाणे चांगलेच गाजले होते. या गाण्याला अनुसरून एक घटना खोपोली मध्ये घडली असून आपल्या सोबत काम करणाऱ्या महिलेला आती क्या रूम पे असे बोलून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला जेलची हवा खावी लागली आहे. संतोष यादव असे या आरोपीचे नाव आहे. खोपोलीतील (Khopoli) डॉमिनोज पिझ्झामध्ये तो व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. खोपोली पोलीस (Police) ठाण्यात संतोष यादव विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील पहा -

खोपोलीतील ईन्फीनिटी या इमारतीत तळ मजल्यावर दर्शनी भागात जगविख्यात ब्रँन्ड डाँमिनोज पिझ्झाचे दुकान आहे. संतोष यादव हा याठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. पीडित महिलाही डाँमिनोज पिझ्झामध्ये काम करीत आहे. आरोपी संतोष याने पीडित महिलेला ड्युटी रजिस्टर मागून तिच्या हाताला स्पर्श करून व्यवस्थीत काम करत नाहीस तसेच माझे समाधान देखील करत नाहीस, असे बोलून तक्रारदार हिचे मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्याचबरोबर तु मेरे साथ मेरे रूम पर चल, मेरे रूम पर कोई नही, तूझे अकेले में बात करनी है. असे सतत बोलुन पीडित महीलेला सतत कामात हिणवत असे.

पीडित तक्रारदार महिलेने ही बाब आपल्या पतीस सांगितल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. मात्र पीडित महिलेवर होत असलेल्या अत्याचाराबाबत तेथील तिच्या सहकाऱ्यांनीही तिला मदत न करता तक्रार करू नको अशी विनवणी करीत होते. अखेर पीडित महिलेने हिंमत करून खोपोली पोलीस ठाण्यात संतोष विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT