पूरग्रस्त नागरिकांना तातडीने शासकीय मदत द्यावी - राज्यपाल अमोल कलये
महाराष्ट्र

पूरग्रस्त नागरिकांना तातडीने शासकीय मदत द्यावी - राज्यपाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज चिपळूण दौऱ्यावर आले होते. त्यांनी चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला.

अमोल कलये.साम टीव्ही रत्नागिरी

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे चिपळूण शहरावर दुर्दैवी वेळ आली आहे. मात्र, प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुहागर येथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊस येथे झालेल्या आढावा बैठकीत दिली आहे.

हे देखील पहा -

पुढे बोलताना ते म्हणाले, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत करणे महत्वाचे असून केंद्र शासनाकडूनही आवश्यक ती मदत दिली जाईल. संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज चिपळूण दौऱ्यावर आले होते. त्यांनी चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला.

आपल्या या भेटीदरम्यान राज्यपालांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सध्या देण्यात येत असलेल्या मदतीबाबतचीही माहिती दिली. हे मदत कार्य असेच सुरू राहावे आणि प्रत्येक पूरग्रस्त नागरिकास शासकीय मदत वेळेवर पोहोचवावी, अशा सूचना यावेळी राज्यपालांनी सरकारला केल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday horoscope : आयुष्यातील अडचणी दूर होणार; ५ राशींच्या लोकांना सुख आणि आनंदाचे दिवस येणार

निवडणुकीआधी लाडकीला दिलासा, ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ

Maharashtra Politics: महायुतीत महाभूकंप, शिंदेसेनेविरोधात भाजपचं ऑपरेशन लोटस

Maharashtra Live News Update: पुण्यातील शेकोटी बंदी असताना अनेक ठिकाणी पेटल्या शेकोट्या

मोठी बातमी! निवडणूक आयोगाचे दोन पत्र, सर्व उमेदवार ठरणार अपात्र?

SCROLL FOR NEXT