भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे रस्त्यावरील खड्ड्यात होम हवन
भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे रस्त्यावरील खड्ड्यात होम हवन प्रदीप भणगे

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे रस्त्यावरील खड्ड्यात होम हवन

कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात असलेल्या आशेळे माणेरे गावच्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे.
Published on

कल्याण : कल्याण पूर्वेतील आशेळे-माणेरे गावच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दोन वर्षांपूर्वी या रस्त्यासाठी निधी मंजूर होऊन सुद्धा काम होत नसल्याने भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी होमहवन करत उपहासात्मक आंदोलन केले आहे.

हे देखील पहा -

कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात असलेल्या आशेळे माणेरे गावच्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, असे असताना सत्ताधारी या मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाला परवानगी देत नसल्याने आता रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे रस्त्यावरील खड्ड्यात होम हवन
महावितरणतर्फे महाडमध्ये युद्धपातळीवर काम सुरू

स्थानिक हैराण झाले आहेत म्हणून भाजप आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी आंदोलन केले आहे. या आंदोलनात शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com