flights from chipi to bangalore and hyderabad will begin on 18 march saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg Chipi Airport : सिंधुदुर्गहून बंगळुरू, हैदराबादसाठी विमान; चिपी विमानतळ सज्ज, जाणून घ्या फ्लाईटची वेळ, दिवस व तिकीट दर

Chipi Airport Latest Marathi News : सध्या चिपी विमानतळावरून अलायंस एअर कंपनीची मुंबईकरिता एकच सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू आहे. आता अन्य एक कंपनी पुढे आली.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

येत्या साेमवारपासून (ता. 18 मार्च) सिंधुदुर्ग येथील चिपी विमातळावरून (chipi airport) हैदराबाद (sindhudurg) आणि बंगळुरसाठी (bangalore) विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. या फ्लाईटचे वेळापत्रक तसेच तिकीट विक्री 'फ्लाय ९१' कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर पाेस्ट केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'उडान ५' योजनेंतर्गत (UDAN 5.0 Scheme) मोपा विमानतळ (Manohar International Airport), चिपी विमानतळ (chipi airport), बंगळूर, हैदराबाद, जळगाव, नांदेड तसेच पुणे या शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरू करण्याचा परवाना देण्यात आला आहे. यामुळे विमान कंपन्यांसह सेवेचा प्रवाशांना फायदा हाेणार हे निश्चित.

'फ्लाय ९१' या कंपनीचे मुख्य कामकाज गोव्यातील मोपा विमानतळ येथून हाेणार. चिपी वरून 'फ्लाय ९१' या कंपनीची आठवड्यातून सोमवार, शुक्रवार आणि शनिवार बंगळुरसाठी तर मंगळवार आणि शनिवार हैदराबादसाठी विमानसेवा 18 मार्चपासून सुरू होत आहे. (Maharashtra News)

या सेेवेसाठी तिकीट दर २१०० रुपये असून बंगळूर आणि हैदराबाद येथून फ्लाईटची वेळ सकाळी ९.५५ असेल. ते चिपी येथे सकाळी ११.४० वाजता पोहोचेल. चिपी येथून विमान दुपारी १२.१० वाजता उड्डाण करून दुपारी दीड वाजता हैदराबाद आणि बंगळूर येथे पोहचेल याची प्रवाशांनी नाेंद घ्यावी असे कंपनीने नमूद केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT