बीड - स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड Beed जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्या हस्ते, मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा जिल्हा पोलिस अधिक्षक आर राजास्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार Ajit Kumbhar यांची उपस्थिती होती. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत अस धनंजय मुंडे यांनी सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की राज्यामध्ये कोरोना Corona महामारी पूर या संकटाची किनार आहे. मुख्यमंत्री मंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची वाटचाल सुरू आहे जिह्यातील 1लाख लोकांना कोरोना पासून सुखरूप वाचवले आहे तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने तयारीं पूर्ण केली मात्र तिसरी लाट येऊच नये अशी ईश्वर चरणी प्रार्थना .शिक्षण रोजगार सर्वच क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
हे देखील पहा -
शेतकऱ्यांना 900 कोटी चे पीक कर्ज वाटप केले आहे कायदा सु -व्यवस्थेसाठी पोलीस दलाला जिल्हा नियोजन मधून मदत केली आहे परळी सिरसाळा येथे 35 एककर वर एम आय डीसी उभारणी काम सुरू आहे जिल्ह्यातील शेती साठी पाणी प्रश्न सुटावा यासाठी उपाययोजना करत आहोत. शेतकऱ्यांना साठी इ- पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात झाली आहे.
ऊसतोड हंगामात ऊसतोड मजूर लाखो ऊसतोड मंजूर च्या जीवनात बदल घडवण्यासाठी मंडळ स्थापन केले त्याचे कार्यालय -मुंबई आणि परळीत स्थापन होणार आहे संत भगवान बाबाच्या नावाने 12 वस्ती गृह सुरू करणार तसेच सामजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षणापासून दूर असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मिशन डायरेक्ट एज्युकेशन सुरू केले असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.