न्या. दिपांकर दत्तांकडून मुख्यमंत्री सहायत्ता निधीला ३ कोटींची मदत

राज्य सरकार करीत असलेल्या कोविडच्या लढाईत न्यायालयाच्या सामजिक जबाबदारीचा हा भाग आहे असे त्यांनी म्हटले आहे.
न्या. दिपांकर दत्तांकडून मुख्यमंत्री सहायत्ता निधीला ३ कोटींची मदत
न्या. दिपांकर दत्तांकडून मुख्यमंत्री सहायत्ता निधीला ३ कोटींची मदत saam tv news
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता (Chief Justice Dipankar Dutta) यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ३ कोटी ४१ लाख ९८ हजार ५९७ चा धनादेश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला.

न्या. दिपांकर दत्तांकडून मुख्यमंत्री सहायत्ता निधीला ३ कोटींची मदत
१२ आमदारांच्या यादी बाबत राज्यपालांकडून खुलासा! पहा काय म्हणाले राज्यपाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राज्य सरकार करीत असलेल्या कोविडच्या लढाईत न्यायालयाच्या सामजिक जबाबदारीचा हा भाग आहे असे त्यांनी म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा न्यायाधीश तसेच न्यायालयीन कर्मचारी यांचे यात योगदान आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमांमध्ये शिथीलता दिली. पण, राज्यातील कोरोनाचे संक्रमण वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा इशाराही दिला आहे. ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी जनतेला कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

उद्यापासून राज्यात अनेक निर्बंध शिथिल केले जात आहेत. मात्र कोरोनाचं संकट अद्यापही कायम आहे. आता निर्बंध शिथिल करत असलो तरी कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढू नये, यासाठी आपल्यालाच खबरदारी घ्यायची आहे, पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ देऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com