१२ आमदारांच्या यादी बाबत राज्यपालांकडून खुलासा! पहा काय म्हणाले राज्यपाल

पुण्यात आज राज्यपाल विधानभवन येथे ध्वजारोहण करीता आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
१२ आमदारांच्या यादी बाबत राज्यपालांकडून खुलासा! पहा काय म्हणाले राज्यपाल
१२ आमदारांच्या यादी बाबत राज्यपालांकडून खुलासा! पहा काय म्हणाले राज्यपालअश्विनी जाधव-केदारी

पुणे : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या 12 आमदारांच्या MLA नियुक्तीबाबत राज्यपालांनी Governor प्रथमच पुण्यामध्ये Pune आज प्रतिक्रिया दिली, काँग्रेसचे Congress विधान परिषद मधील मधील नेते शरद रणपिसे Sharad Ranapise यांनी आज राज्यपालांना 12 आमदारांच्या नियुक्ती बाबत विचारले असता, राज्यपालांनी सोबत अजित पवार Ajit Pawarआहेत. ते माझे मित्र आहेत. राज्यसरकार आग्रह धरत नाही, तुम्ही का धरता म्हणत गुगली टाकली. त्यावर अजित पवारांनी हसत- हसत आज स्वातंत्र्य दिन आहे आज या विषयावर बोलायला नको मी नंतर कधीतरी बोलेन असे सांगत राज्यपालांनी टाकलेला बॉल सोडून दिला.

हे देखील पहा-

पुण्यातील विधानभवन Vidhan Bhavan ​येथे आज राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, ध्वजारोहणानंतर राज्यपाल विविध मान्यवरांच्या भेटी घेत असताना 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत चर्चा झाली. मात्र, याच मुद्द्यावर खासदार गिरीश बापट यांनी मात्र प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालच म्हणत आहेत, सरकार इनसिस्ट करत नाही. याचा अर्थ आघाडी सरकारच्या नेत्यांत समन्वय नाही. यामुळे तुम्ही काय ते समजून घ्यावं असं बापट म्हणाले आहेत.

१२ आमदारांच्या यादी बाबत राज्यपालांकडून खुलासा! पहा काय म्हणाले राज्यपाल
१२ हजार रुपयांनी स्वस्त मिळतोय आयफोन, पण कुठे?

राज्यपाल नियुक्त १२ जागांकरिता महाविकास आघाडीच्यावतीने मंत्रिमंडळात शिफारस केलेल्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आलेली होती. मात्र, ती यादी राजभवनात उपलब्ध नसल्याची माहिती अधिकार कायदा अंतर्गत समोर दिसून आली होती. यावरुन राज्यामधील  राजकारण देखील तापले होते. मात्र, आता ती १२ आमदारांची यादी राजभवनातच असल्याची माहिती आहे.

Edited By- digambar jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com