Jalana Stray Dogs News 
महाराष्ट्र

Stray Dogs: ७ वर्षीय चिमुरड्यावर ५ कुत्र्यांचा बिबट्यांसारखा हल्ला, शेतात नेलं अन् अंगाचे लचके तोडले, ११० टाके

Jalana Stray Dogs: जालन्यामध्ये मोकाट कुत्र्यांनी सात वर्षांच्या चिमुकल्याचे लचके तोडले आहेत. त्याच्या अंगावर तब्बल ११० टाके पडले आहेत. जालन्यामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आहे, पण महानगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे-पाटील, जालना प्रतिनिधी

Jalana Stray Dogs News : जालन्यात मोकाट कुत्र्यांनी सात वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पाच कुत्र्‍यांनी सात वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला केला. यामध्ये त्याला तब्बल ११० टाके पडले आहेत. जालना शहरातील भवानीनगर परिसरात ही घटना घडली. चिमुरड्याची स्थिती पाहून परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जालन्यातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. पण याकडे महानगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे.

जालन्यात मोकाट कुत्र्यांनी एका सात वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जालना शहरातील भवानी नगर परिसरामध्ये पाच मोकाट कुत्र्यांनी मिळून एका चिमुकल्याचे अक्षरशः लचके तोडलेत. या घटनेत या चिमुकल्याला तब्बल 110 टाके पडले आहे. जालना शहरातील भवानी नगर भागामध्ये राहणाऱ्या कार्तिक थोरात याला मोकाट कुत्र्यांनी ओढत शेजारच्या शेतात नेऊन तब्बल दहा मिनिट हल्ला केला आहे. या हल्ल्यात या चिमुकल्याच्या शरीराची अक्षरशः चाळणी झाली असून डॉक्टरने 110 टाके देऊन त्याच्या जखमा शिवल्या आहेत. दरम्यान या घटनेमुळे जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

थोरात कुटुंब आर्थिक अडचणीत

जालना शहरातील भवानी नगर भागात राहणाऱ्या कार्तिक थोरात या मुलावर पाच कुत्र्यांनी मिळून तब्बल दहा मिनिटे हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या शरीराची अक्षरशः चाळणी झाली आहे. त्याला रुग्णालयात नेल असता डॉक्टरांनी तब्बल 110 टाके देऊन त्याच्या शरीरावरील जखमा शिवल्या आहे. दरम्यान आतापर्यंत कार्तिकच्या उपचारांवर जवळपास तीन लाख रुपयांचा खर्च झाला असून अद्यापही उपचार सुरूच आहे . कार्तिकचे वडील खाजगी टँकरवर चालक म्हणून काम करत आहे तर आई गृहणी म्हणून काम करत आहे. त्यामुळे या थोरात कुटुंबावर आता आर्थिक संकट आल आहे...

भटक्या कुत्र्यांकडून होणारे हल्ले काही नवे नाहीत मात्र आता त्यात सातत्यानं वाढ होत असल्यानं प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३० हजार पगार, २० हजार भाडं; मोठी शहरं.. मध्यमवर्गीयांनी जगावं तरी कसं? विश्लेषकाची पोस्ट व्हायरल

Sangram Jagtap: हिंदूंच्या दुकानात 'लादेन आणि सद्दाम'चे फटाके कसे? अजित पवारांच्या आमदाराचा सवाल|VIDEO

Rohit Sharma Fitness: रोहित शर्माने कसं कमी केलं १० किलो वजन? तब्बल 252 तास हिटमॅनने घेतली इतकी मेहनत

Tharala Tar Mag: 'ज्योती ताईंच्या आठवणी जाग्या...'; पूर्णा आजीच्या एन्ट्रीवर जुई गडकरी झाली भावूक, म्हणाली- 'रोहिणी ताई सेटवर...'

Maharashtra Live News Update : महाराष्ट्राच्या यादीत ९६ लाख बोगस मतदार - संजय राऊत

SCROLL FOR NEXT