Maharashtra Politics: जयंत पाटील आमच्याकडे येतील, शिंदे सेनेच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Jayant Patil : जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली.
Jayant Patil
Jayant Patil
Published On

Minister Gulabrao Patil Claims Jayant Patil Will Join Shiv Sena : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपसह अजित पवार गटही पायघड्या घालून तयार आहे. त्यामध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने उडी घेतली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी जयंत पाटील आमच्याकडे येतील, असा दावा केला आहे. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर जंयत पाटील शरद पवारांची साथ सोडणार असल्याच्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी जयंत पाटील शिवसेनेत येतील असे वक्तव्य केले. त्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले. जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार आहेत का? याबाबत राजकीय चर्चेला जोर आला. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. विधानसभा अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना साद घातली होती. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेते गुलाबराव पाटील यांनी जयंत पाटील आमच्याकडे येतील असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.

Jayant Patil
Jayant Patil : माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ

मंत्री गुलबाराव पाटील काय म्हणाले ? Jayant Patil to Join Shinde Sena?

जयंत पाटील हे आमच्याकडे येतील. मी नाराज नाही मला बाहेर बोलण्याची चोरी आहे, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं होतं यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे..

Jayant Patil
Jayant Patil : जयंत पाटलांची विरोधकांच्या आंदोलनाकडे पाठ, मनात नेमकं काय?

लोकसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा रंगलीय. मात्र त्याची कारणं काय आहेत?

जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार का?

- राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदावरुन असलेला सुप्त संघर्ष

- साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत

- विधानसभा निवडणुकीत घसरलेलं मताधिक्य

- मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य

- मंत्रिमंडळातील खुणावत असलेलं 1 रिक्त मंत्रिपद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com