कार अपघातात बाळासह पाच जण सुखरूप ! जयेश गावंडे
महाराष्ट्र

कार अपघातात बाळासह पाच जण सुखरूप !

अकोल्यातील कारंजा रोडवर रानटी डुक्कर आडवे आल्याने चार चाकी गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातातील 17 महिन्याच्या बालकासह पाच जण सुखरूप बचावल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील कारंजा रोडवर रानटी डुक्कर आडवे आल्याने चार चाकी गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातातील 17 महिन्याच्या बालकासह पाच जण सुखरूप बचावल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. पहाटे 2:30 वाजता पिंजर येथील आशिष मानकर याने जिवरक्षक दीपक सदाफळे यांना फोनवरून माहिती दिली की, माझ्या मित्राची गाडी कारंजा रोडवर पलटी होऊन अपघात झाला आहे.

हे देखील पहा -

माहिती मिळताच पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दहा मिटितांच्या आत घटनास्थळी धाव घेतली. संबंधितांची विचारपुस केली असता धानोरा ताथोड ता.कारंजा जिल्हा वाशिम येथील रहिवासी असलेले कुटुंब आपल्या 17 महिन्याच्या बाळाला कारंजा येथील खासगी हाॅस्पिटल येथुन डाॅक्टरांच्या सांगण्यानुसार अकोला घेऊन चालले होते.

यावेळी कारने कारंजावरुन अकोल्याकडे जात असताना पिंजर जवळील टर्निंगवर डुक्कर आडवे गेल्याने कार पलटी झाली अन अपघात झाला! दैव बलवत्तर म्हणून या कारमधील सर्वजण सुखरुप आहेत. क्षणाचाही विलंब न करता जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपल्या गाडी मध्ये बाळासह बाळाचे आई वडील व आजोबांना घेऊन अकोला येथे हाॅस्पिटल मध्ये दाखल केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilha Parishad School : बंद पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट; शिक्षक दाम्पत्याच्या योगदानाला लोकसहभागाची साथ

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT