Crime Saam tv
महाराष्ट्र

एकाच कुटुंबातील ५ जण घरातून अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे, पळाले की घातपात? नेमकं काय घडलं?

Nagpur missing family : नागपूरमधील एकाच कुटुंबातील पाच जण २४ जूनपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात आढळल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. कर्जबाजारीपणा, स्वेच्छेने पलायन की घातपात? या सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Five family members missing from Nagpur : उपराजधानी नागपूरच्या धंतोली परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एकाच कुटुंबातील तब्बल पाच जण २४ जूनपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. गेल्या ११ दिवसांपासून या पाचही जणांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. धंतोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या सर्वांचे शेवटचे मोबाईल लोकेशन थेट पुणे येथे दाखवत असल्याने पोलिसांचे एक पथक तपासासाठी रवाना झाले आहे.

नेमकं काय घडलं?

धंतोली परिसरात ७१ वर्षीय श्यामसुंदर परसवानी हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्याच घरात त्यांचे दिवंगत भाऊ सुरेश परसवानी यांचे कुटुंबही वास्तव्यास आहे. २४ जून रोजी सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील पाचही सदस्य कोणालाही काहीही न सांगता घरातून अचानक निघून गेले. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली, मात्र कोणाचाही काहीही सुगावा लागला नाही. अखेर हताश होऊन श्यामसुंदर परसवानी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

बेपत्ता झालेल्या सदस्यांची नावे:

हर्षा परसवानी (वय ५७ वर्षे), जितेंद्र परसवानी (वय ४२ वर्षे), इशिता परसवानी (वय ४० वर्षे), खुशी परसवानी (वय २१ वर्षे), कृष्णा परसवानी (वय १२ वर्षे)

कर्जाचा डोंगर आणि पुण्याचे कनेक्शन?

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, बेपत्ता असलेल्या सदस्यांपैकी एकावर मोठ्या प्रमाणावर कर्जाचा डोंगर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून या कुटुंबाने हे पाऊल उचलले की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) केले असता, सर्वांचे शेवटचे लोकेशन पुणे येथे आढळून आले आहे. हे सर्वजण स्वतःहून पुण्यात गेले की त्यांच्यासोबत काही घातपात झाला आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट

Railway Booking : रेल्वेचा मोठा निर्णय! १५ मिनिटे आधीही बुक करता येणार कन्फर्म तिकीट; वाचा A to Z माहिती

Petrol Diesel Price Today: 'या' शहरात पेट्रोल ₹८८.६६ तर डिझेल ८४.५६ रुपये; सरकारी कंपन्यांनी दर घटवले का?

Dadpe Pohe Recipe: सकाळच्या नाश्त्याला घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट दडपे पोहे; वाचा सोपी रेसिपी

Heart Attack Symptoms : सकाळी उठताच दिसतात हॉर्ट अॅटकची ही ६ लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात

SCROLL FOR NEXT