Surekha Yadav Vande Bharat Train Video Saam TV
महाराष्ट्र

Surekha Yadav : वंदे भारत एक्स्प्रेस पहिल्यांदाच महिलेच्या हाती; मराठमोळ्या लेकीचा ट्रेन चालवतानाचा VIDEO पाहाच

Surekha Yadav : सुरेखा यांनी सोलापूर ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली.

Satish Daud

Surekha Yadav Vande Bharat Train Video : आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी सोमवारी पुन्हा एका इतिहासाला गवसणी घातली. सुरेखा यांनी सोलापूर ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली. त्यासाठी, गेल्या महिनाभरापासून त्या प्रशिक्षण घेत होत्या. वंदे भारत चालवणारी देशातील पहिली महिला असा बहुमान त्यांना यानिमित्ताने मिळाला आहे. (Latest Marathi News)

ट्रेनच्या चालकास लोको पायलट असं म्हटलं जातं. गेल्या अनेक वर्ष मालगाड्यांपासून ते प्रवासी रेल्वे गाड्या चालवल्यानंतर सुरेखा यांचं वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे स्वप्न होते. ते अखेर पूर्ण झालं. मूळच्या सातार कन्या असलेल्या सुरेखा यादव यांनी सोलापूर रेल्वे स्थानकाहून वेळेत प्रस्थान केलं.

निर्धारीत वेळेपेक्षा ५ मिनिट अगोदर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठलं. यावेळी, नव्या युगातील हायस्पीड वंदे भारत रेल्वे चालवण्याची संधी आणि जबाबदारी दिल्याबद्दल रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांनी आभारही व्यक्त केले.पहिली महिला पायलट म्हणून नियुक्ती झाल्यावर यादव यांचा रेल्वेकडून सत्कार करण्यात आला.

कोण आहेत सुरेखा यादव?

मूळच्या सातार कन्या असलेल्या सुरेखा यादव यांनी सुरेखा यादव यांचे शालेय शिक्षण सातारा येथील सेंट पॉल शाळेत झाले. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण करून भारतीय रेल्वेत त्यांनी नोकरी सुरू केली. १९८९ मध्ये सहाय्यक चालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

१९८८ मध्ये रेल्वे विभागात नोकरी जॉईन केली. त्यावेळी, आशियातील पहिली महिला लोको पायलट होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. आता, लोको पायलट प्रशिक्षक बनूनही त्या कार्यरत आहेत. गेली अनेक वर्ष रेल्वे सेवेत मालगाडी तसेच प्रवासी रेल्वे चालवणाऱ्या सुरेखा यांचं वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचं स्वप्न होतं. सोमवारी ते पूर्ण झालं.

गाडीतील नवीन उपकरणे त्यांना हाताळण्यासाठी पायलटला योग्य प्रशिक्षण देण्यात येते. हे सर्व प्रशिक्षण यादव यांनी पूर्ण केलं. त्यानंतर प्रथमच वंदे भारत एक्स्प्रेसचे सारथ्य करताना आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट होण्याचा मान मिळवला आहे. सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात नाव कोरले असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, सुरेखा यांचा वंदे भारत एक्सप्रेस चालवतानाचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. जो मध्य रेल्वेने ट्विट केला आहे. ज्यामध्ये केबीनमधून दिसणारा अद्भुत नजारा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करत वंदे भारत – नारी शक्तीच्या हाती, असं लिहिलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT