Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: अंबाजोगाईत पहिला भव्य अश्व रिंगण सोहळा रंगला! सोहळ्यात वारकऱ्यांनी फुगड्या, कुस्ती खेळाचा लुटला आनंद

विनोद जिरे

विठ्ठल नामाच्या जयघोषात बीडच्या अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर मराठवाड्यातील पहिला भव्य अश्व रिंगण सोहळा रंगला होता.

संतश्रेष्ठ नरसी नामदेव व गंगाखेड येथील संत जनाबाई यांचं गुरू शिष्याचं नातं आहे. या पालख्यांच्या एकत्रीकरणातून अश्व रिंगण झाले. मागील 14 वर्षांपासून हा अश्व रिंगण सोहळा अंबाजोगाई संयोजन समितीकडून आयोजित करण्यात येतो.

यावेळी भगव्या पताका हाती घेतलेल्या वारकऱ्यांनी गोल रिंगण केले. बघता, बघता या रिंगणात अश्व फिरवण्यात सुरुवात झाली. हरीनाम व विठ्ठल नामाच्या जयघोषात अश्वानेही रिंगणात फिरण्याचा वेग घेतला. डोळ्याचे पारणे फेडणारा हा अश्वरिंगण सोहळा बघण्यास शहर व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. अश्वरिंगणानंतर याच रिंगणात वारकऱ्यांनी वारकरी पाऊल, फुगड्या, कुस्त्या, हुतूतू असे खेळ खेळत टाळ, अभंगाच्या तालात वारकरी या खेळात दंग झाले होते.

या निमित्त पालखीचे आगमन होण्यापूर्वी याच मैदानावर शालेय विद्यार्थ्यांची वेशभूषा व नृत्य स्पर्धा झाली. त्यात विविध शाळेच्या संघांनी सहभाग घेऊन वेशभूषा सादर केली. याचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. विशेष म्हणजे वारकरी आणि भाविकभक्त वाखरी आणि पंढरपूरला जो सोहळा होतो, अगदी तसाच सोहळा या ठिकाणी अनुभवता येत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : PM मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतून, बघा काय म्हणाले?

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

Marathi News Live Updates : काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता येते ती राज्य उध्वस्त होतात, नरेंद्र मोदी

SCROLL FOR NEXT