Richest Thief: अट्टल चोराचं मुंबईत 1 कोटीचं घर, आलीशान ऑडी, लक्झरी हॉटेलात शाही थाट..!

Gujarat's 'Richest' Thief News: गुजरात पोलिसांनी रोहित सोलंकी नावाच्या तरुणाला अटक केली आहे. रोहित आलिशान हॉटेलमध्ये राहायचा आणि विमानाने प्रवास करत असे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचा मुंबईत एक कोटीहून अधिक किमतीचा फ्लॅट आहे.
अट्टल चोराचं मुंबईत 1 कोटीचं घर, आलीशान ऑडी, लक्झरी हॉटेलात शाही थाट..!
Rohit Kanubhai SolankiSaa m Tv

गुजरातमधील वापी पोलिसांनी एका अशा चोराला अटक केली आहे, ज्याची संपत्ती जाणून पोलिसांनाही धक्का बसला आहे. या चोराचे नाव आहे रोहित सोळंकी. आरोपी रोहित कनुभाई सोळंकी आलिशान हॉटेलमध्ये राहायचा आणि विमानाने प्रवास करायचा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याला एक लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी अटक केली असता ही माहिती समोर आली आहे.

गुजरात पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, आरोपी रोहित सोळंकी याने अनेक राज्यात चोरी केली आहे. जून महिन्यात रोहित सोळंकी याने वापी येथे एक लाख रुपयांची चोरी केली होती. याप्रकरणी पोलीस चोराला शोध होती.

अट्टल चोराचं मुंबईत 1 कोटीचं घर, आलीशान ऑडी, लक्झरी हॉटेलात शाही थाट..!
Washim News : पत्नीची निर्घृण हत्या आणि पतीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत; परिसरात खळबळ

याप्रकरणी पोलिसांनी रोहितला अटक केली. पोलिसांनी रोहितची चौकशी केली असता, रोहित चोरीच्या पैशातून ऐशोआराम जीवन जगत असल्याचे समोर आले. आरोपी रोहितने 19 चोरी जागी चोरी केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये वलसाडमध्ये तीन, सुरतमध्ये एक, पोरबंदरमध्ये एक, सेलवालमध्ये एक, तेलंगणामध्ये दोन, आंध्र प्रदेशमध्ये दोन, मध्य प्रदेशमध्ये दोन आणि महाराष्ट्रात एक जागी चोरी केल्याची त्याने कबुली दिली.

पोलीस तपासादरम्यान रोहित सोळंकी याने मुंबईतील मुंब्रा परिसरात एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा आलिशान फ्लॅट खरेदी केल्याची माहिती समोर आली. ज्यामध्ये तो राहत होता. याशिवाय त्याकडे ऑडी कारही आहे.

अट्टल चोराचं मुंबईत 1 कोटीचं घर, आलीशान ऑडी, लक्झरी हॉटेलात शाही थाट..!
Hingoli Breaking: धक्कादायक! समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना घरात घुसून मारहाण, शासकीय वर्तुळात खळबळ

वलसाड पोलिसांनी सांगितले की, रोहित आलिशान हॉटेल्समध्ये राहायचा, फ्लाइटने प्रवास करायचा आणि हॉटेलमध्ये ये-जा करण्यासाठी कॅब बुक करायचा. चोरी करण्याआधी तो दिवसा सोसायट्यांमध्ये जाऊन रेकी करायचा. पोलिसांनी सांगितले की, आरोपी रोहितला मुंबईतील डान्स बार आणि नाईट क्लबमध्ये पार्टी करायची आवड आहे. त्याला ड्रग्जचेही व्यसन आहे. तो दरमहा 1.50 लाख रुपये खर्च करतो. मात्र आता तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com