संदिप नागरे, साम टीव्ही हिंगोली
हिंगोलीमध्ये समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांना घरात घुसून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना काल ४ जूलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीमध्ये सहाय्यक आयुक्त गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हिंगोलीमध्ये समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दोन जणांनी मध्यरात्री शासकीय निवासस्थानात घुसून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मारहाणीमध्ये सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड गंभीर जखमी (Hingoli Breaking) झालेत. त्यांच्यावर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस काय म्हणाले ?
प्रकरणी हिंगोली शहर पोलीस स्थानकात आरोपी रवींद्र वाढे यांच्यासह आणखी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात (crime news) आलाय. दरम्यान समाज कल्याण विभागात कंत्राटी पद्धतीने संगणक ऑपरेटर पद भरण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची प्रार्थामिक माहिती पोलिसांनी दिली आहे. हिंगोलीमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचं दिसत आहे. शासकीय अधिकाऱ्यालाच मारहाण झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. पोलीस घडलेल्या प्रकाराची कसून चौकशी करत (Social Welfare Assistant Commissioner) आहेत.
कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न
हिंगोलीमध्ये समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांना मारहाण झाल्याची घटना (Hingoli News) घडलीय. त्यांच्या निवासस्थानी त्यांना मारहाण करण्यात आली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. घडलेल्या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरामध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.