VIDEO: नागरिकांच्या आरोग्याशी Kem हाॅस्पिटलचा खेळ, पेपर प्लेटसाठी वापरले रुग्णांचे रिपोर्ट; पाहा व्हिडिओ

Mumbai News: तुम्ही ज्या पेपर प्लेटमध्ये खाताय ती प्लेट धोकादायक तर नाही ना? पेपर प्लेट तयार करताना नागरिकांच्या आरोग्याशी खेळ तर सुरु नाही ना?
नागरिकांच्या आरोग्याशी Kem हाॅस्पिटलचा खेळ, पेपर प्लेटसाठी वापरले रुग्णांचे रिपोर्ट; पाहा व्हिडिओ
Kem Hospital Patients Used for Paper PlatesSaam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबईकरांनो सावधान.. तुम्ही ज्या प्लेटमधून खाताय ती प्लेट धोकादायक तर नाही ना? कारण केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या रिपोर्ट कार्डचा वापर खाद्यपदार्थांच्या प्लेट बनवण्यासाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. तर मनसे आणि ठाकरे गटाने केईएम रुग्णालय आणि महापालिकेवर हल्लाबोल केलाय.

'महापालिकेला भीक लागली का?'

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, महापालिकेला भीक लागली का? अशा गोष्टी करायला. आज तुम्ही रिपोर्ट विकताय, उद्या आणखी काही विकाल. हा चुकीचा प्रकार असून याची चौकशी झालीच पाहिजे.

नागरिकांच्या आरोग्याशी Kem हाॅस्पिटलचा खेळ, पेपर प्लेटसाठी वापरले रुग्णांचे रिपोर्ट; पाहा व्हिडिओ
Rrichest Thief: अट्टल चोराचं मुंबईत 1 कोटीचं घर, आलीशान ऑडी, लक्झरी हॉटेलात शाही थाट..!

रुग्णांचे रिपोर्ट हे सर्रासपणे हाताळले जातात. ते कुठेही ठेवले जातात. त्यामुळे रुग्णांच्या रिपोर्टचा वापर पेपर प्लेटसाठी करणं धोकादायक आहे. त्यामुळेच अशा बेजबाबदारपणावर साम टीव्हीने काही सवाल उपस्थित केलेत.

साम टीव्हीचे सवाल

1) पेपरप्लेटसाठी रुग्णांचे रिपोर्ट हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ नाही का?

2) पेपरप्लेटसाठी हॉस्पिटलचे रिपोर्ट वापरणं हा हॉस्पिटलचा बेजबाबदारपणा नाही का?

3)रुग्णांचे रिपोर्ट गोपनीय असताना ते रद्दीत विकणे गोपनीयतेच्या हक्काचा भंग नाही का?

नागरिकांच्या आरोग्याशी Kem हाॅस्पिटलचा खेळ, पेपर प्लेटसाठी वापरले रुग्णांचे रिपोर्ट; पाहा व्हिडिओ
Assembly Election: विधानसभेसाठी काँग्रेस लागली कामाला, 288 जागांवर चाचपणी सुरू; ठाकरे-पवारांचं टेंशन वाढणार?

एकीकडे रुग्णांच्या रिपोर्टचा वापर खाद्यपदार्थांसाठी करणं आणि दुसरीकडे रिपोर्टचा वापर पेपर प्लेटसाठी करून लोकांच्या गोपनियतेचा खेळ करणं ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या रिपोर्टची रद्दी कुणी विकली? लोकांच्या आरोग्याशी आणि गोपनियतेशी कोण खेळतंय? याचा शोध घेऊन कठोर कारवाई करायला हवी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com