Nagpur Firing: आवंडी परिसरातील फॉर्महाऊसवर गोळीबार  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Firing: आवंडी परिसरातील फॉर्महाऊसवर गोळीबार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर: नवीन कामठी पोलीस (Police) ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आवंडी या गावामध्ये (village) फार्महाऊसवर (farmhouse) ८ आरोपींनी (accused) गोळीबार (Firing) केला आहे. ही घटना काल रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. आवंडी (Awandi) गावापासून एक ते दीड किमी अंतरावर आणि नागपूर (Nagpur)- जबलपूर (Jabalpur) महामार्गापासून १ किमी अंतरावर यशपाल ईश्वर शर्मा याच्या शेताच्या (Farm) बाजूला हा फॉर्म हाऊस (Farm House) आहे. (Firing on a farmhouse in Awandi area)

हे देखील पहा-

या फॉर्म हाऊसमध्ये पत्नी आणि २७ वर्षीय मुलाबरोबर राहून ते शेती करतात. शेतात काम करणाऱ्या मजुरांना त्यांनी भाडय़ाने ठेवले आहे. बुधवारी रात्री तोंडाला कापड बांधून ८ आरोपी आले होते. आरोपींनी फॉर्महाऊसच्या बाहेर गोळीबार केला आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून मजूर (Labor) बाहेर आले. तोच आरोपी वॉल कंपाऊंडवर उडय़ा मारून आत शिरले आणि मजुरांच्या मागे धावले होते. आरोपींच्या हातात पिस्तूल (Pistol) बघून मजूर आपापल्या खोल्यामध्ये शिरले. त्यावेळी शर्मा हे आपल्या कुटुंबीयाबरोबर वरच्या माळय़ावर होते.

आरोपींनी शर्मा यांच्या जि.प.च्या काचा फोडले आणि पळून गेले आहेत. नवीन कामठी पोलिसांचा (Police) ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. अद्याप आरोपी सापडले नाहीत. आरोपींनी लुटमार न करता केवळ गोळीबारच का केला आहे, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. आरोपींनी ३ वेळेस गोळीबार करत दहशत निर्माण केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे, अशी माहिती नवीन कामठीचे पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी यावेळी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

Maharashtra News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाशिम दौरा रद्द

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

SCROLL FOR NEXT