Bandatatya karadkar Statement: बंडातात्या कराडकरांच्या वक्तव्यानंतर रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया

सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधामध्ये आंदोलन करत असताना दारु तसेच राजकीय नेत्यंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे कीर्तनकार बंडातात्या कराडकर चांगलेच अडचणीत सापडले
Rupali Chakankar On Bandatatya Karadkar
Rupali Chakankar On Bandatatya KaradkarSaam Tv
Published On

पुणे : सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री (Wine sales) करण्याच्या निर्णयाविरोधामध्ये आंदोलन करत असताना दारु तसेच राजकीय (Political) नेत्यंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य (Statement) केल्यामुळे कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधामध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रवादीकडून (NCP) राज्यभरात आंदोलन केले जात आहे. सातारा (Satara) पोलिसांनी (Police) त्यांना ताब्यात देखील घेतले आहे. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने (State Women's Commission) देखील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना चाकणकर म्हणाल्या की, वारकरी सांप्रदाय हा महाराष्ट्रात (Maharashtra) प्रबोधनाचे काम करत असते.

हे देखील पहा-

यामुळे वारकरी सांप्रदायातल्या व्यक्तीने आपले म्हणणे मांडत असताना किंवा एखादी गोष्ट पटवून देत असताना महिलांचा अशा पद्धतीने अपमान करणे हे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला पटले नाही. यामुळे जरी त्यांनी माफी मागितली असली तरी अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी करणे हे निंदनीय आहे.

समाजामध्ये प्रबोधन करणाऱ्या व्यक्तीने महिलाविषयी अशा प्रकारचे वक्तव्य करणे ही प्रथा पडू नये आणि केवळ बंडातात्या कराडकरच नाही तर समाजातल्या कोणत्याही व्यक्तीने महिलांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणार नाही अशी जर विधाने केली, तर निश्चितच इथून पुढे त्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या वक्तव्याने बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिला आयोगाने बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याची दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.

Rupali Chakankar On Bandatatya Karadkar
Syria America Air Strike: सीरियामध्ये अमेरिकन सैन्याच्या कारवाईत ISIS चा म्होरक्या ठार

यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग आला होता. गुरुवारी पोलिसांनी बंडातात्यांच्या दोन्ही मठांवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यानंतर शुक्रवारी सकाळपासून पोलिसांनी कारवाईला सुरुवात करण्यात आली. त्यांना मठातून ताब्यात घेतले आहे. साताऱ्यातील फलटण करवडी येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांना साताऱ्याकडे पाठविण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com